पश्चिम बंगालमधील महिलांवरील अत्याचाराचा नगर भाजप महिला आघाडीच्यावतीने निषेध

0
111

नगर – पश्चिम बंगालमधील महिलांवर अत्याचार करणार्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन नगर शहर जिल्हा भाजपा महिला आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना देण्यात आले. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्षा सौ.प्रिया जानवे, सरचिटणीस रेणुका करंदीकर, ज्योती दांडगे, श्वेता झोंड, कालिंदी केसकर, वंदना पंडित, सरचिटणीस सचिन पारखी, प्रशांत मुथा, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, अनिल निकम, तुषार पोटे, अनिल मोहिते, अनिल सबलोक, मयुर बोचुघोळ, वैभव झोटिंग, चंद्रकांत दारुणकर, ज्ञानेश्वर धिरडे, राजू वाडेकर, सविता कोटा, सचिन कुसळकर, नरेश चव्हाण, पंडित वाघमारे, गोपाल वर्मा, कार्तिक तम्हारे, सुनिता उल्हारे, मिरा सरोदे आदि उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की पश्चिम बंगालमधील संदेशखालीमध्ये महिला, भगिनी यांच्यावर मोठ्या प्रमाणावर लैगिक अत्याचार केले व अनेक लोकांच्या जमिनीवर ताबेमारी केली आहे.

तेथील मुख्यमंत्र्यांनी मात्र स्वत: एक महिला असूनही या प्रकरणी सोयीस्कर मौन बाळगले आहे. तसेच तेथील पोलिस यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर दबाब आणला असल्याने पोलिस यंत्रणा कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही. या प्रकरणात केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन अन्य तपास यंत्रणाच्या सहाय्याने गुन्हेगारांचा खरा चेहरा समाजापुढे आणून जलदगती न्यायालयात सदर खटला चालवावा व गुन्हेगाराला कठोरात कठोर शासन करावे, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी भाजप पदाधिकारी व महिलांनी निषेधाच्या घोषणा देत तीव्र शब्दात निषेध केला.