वाळूची चोरटी वाहतूक करणारा ढंपर पकडला; एमआयडीसी जवळील कारवाईत एकावर गुन्हा दाखल

0
59

नगर – अवैध वाळू उपसा करून वाळूची चोरटी वाहतुक करणारा ढंपर एमआयडीसी पोलिसांनी पकडला. चार लाखाचा ढंपर, ३० हजाराची तीन ब्रास वाळू असा ४ लाख ३० हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सदरची कारवाई सोमवारी (दि. २५) रात्री ९.३० च्या सुमारास नवनागापूर गावच्या शिवारात दूध डेअरी चौकात करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अंमलदार शुभम सुद्रुक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुकुंद भाऊसाहेब मोरे (वय ३६, रा. निर्मलनगर, सावेडी) याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळू उपसा करून त्याची ढंपर मधून वाहतुक केली जात असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळाली होती. त्यांनी एका पथकाला सदर ढंपर वर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने नवनागापूर गावच्या शिवारात दूध डेअरी चौकात सापळा लावून संशयित ढंपर पकडला. त्यात तीन ब्रास वाळू मिळून आल्याने ढंपर, वाळू असा ४ लाख ३० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. डंपर चालक मुकुंद भाऊसाहेब मोरे (वय ३६,रा. निर्मलनगर, सावेडी) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार संदीप चव्हाण अधिक तपास करीत आहेत.