महेश नागरी पतसंस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी ३१ मार्चला मतदान

0
40

उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात, १७४६ सभासद मतदार पात्र

नगर – भिंगार येथील महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ३१ मार्च रोजी मतदान होणार असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २७ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. महेश नागरी पतसंस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी अल्ताफ शेख यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार २७ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करणे, दाखल अर्जाची छाननी- ५ मार्च, वैध अर्जांची यादी प्रसिद्ध करणे- ६ मार्च, उमेदवारी अर्ज मागे घेणे- ६ ते २० मार्च, निवडणूक चिन्हांचे वाटप- २१ मार्च आणि ३१ मार्च रोजी मतदान होणार असून, मतदानानंतर लगेचच मतमोजणी केली जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शेख यांनी दिली आहे. महेश पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी एकूण १७४६ सभासद मतदार पात्र ठरले आहेत. संस्थेच्या एकूण १७ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यात सर्वसाधारण मतदार संघातून- १२, अनु. जाती जमाती- १, महिला राखीव- २, इतर मागासवर्गीय- १, विमुक्त जाती भटया जमाती किंवा विमाप्र मतदार संघातून १ जागा निवडण्यात येणार आहे. दरम्यान, २७ फेब्रुवारी रोजी दुपारपर्यंत ६ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये प्रकाश कांतीलाल लुणिया, अशोक शांतीलाल चंगेडे, विनोद चंपालाल पोखरणा, सौ. साधना विनोद पोखरणा, प्रमोद माणकचंद मुनोत, बिपीनचंद्र बन्सीलाल लुणिया आदींचा समावेश आहे.