नगरच्या पुणे बसस्थानकावर दागिने चोरणाऱ्यास अंबरनाथ येथे पकडले, सोन्याचे दागिने हस्तगत

0
84

नगर – नगर शहरातील पुणे बस स्थानकावर प्रवासी महिलेचे सोन्याचे दागिने चोरणारा चोरटा कोतवाली पोलिसांनी पकडला आहे. त्याला ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथून अटक करण्यात आली असून त्याने चोरलेले दोन तोळ्याचे सोने हस्तगत करण्यात आले आहे. दि. ४ फेब्रुवारी रोजी सौ. शोभा सतिश मंडलेचा (रा. स्पाईन रोड, आळंदी, पुणे) ह्या त्यांचे पती सोबत त्यांचे नातेवाईक यांचे लग्न सोहळ्याकरिता बडी साजन मंगल कार्यालय, नगर येथे आल्या होत्या. लग्न समारंभ उरकल्यानंतर त्या त्यांचे पती सह पुणे बस स्थानकावर आल्या. दुपारी साधारण ४.४० च्या सुमारास त्या पुण्याकडे जाण्याकरिता बस मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेवुन अज्ञात चोरट्याने त्यांचे डाव्या हातातील अंदाजे २ तोळे वजनाची सोन्याची एक पाटली चोरी केली होती. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास पो. नि. प्रताप दराडे यांचे मार्गदर्शनाखाली पो. हे.कॉ. शाहीद शेख हे करित होते. त्यांनी बस स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रीक विश्लेषन करण्यात येवुन संशयीत इसमांची माहीती घेण्यात आली. गुन्ह्याचा तपास चालु असताना गुन्ह्यातील आरोपी हा अंबरनाथ असुन तो चोरी केलेनंतर त्यांचे गावी गेलेला आहे.

अशी माहिती मिळाली. त्यामुळे एक पथक अंबरनाथ येथे गेले. त्यांनी त्याचा शोध घेत त्याला ताब्यात घेवून नगरला आणले. त्याचे नाव अभिषेक चंदन गागडे (वय २०,रा. फातिमा चर्च पाठीमागे, अंबरनाथ वेस्ट)असे असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली, मात्र चोरीतील मुद्देमालाबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर त्याचा नातेवाईक अमन सुरज गागडे याने कोतवाली ठाण्यात येवून आरोपीने चोरी केलेले २० ग्रॅम वजनाची सोन्याची पाटली ही सोन्याचे लगड स्वरुपात पंचासमक्ष हजर केल्याने ती गुन्ह्याचे तपासात जप्त करण्यात आली आहे. सदरची कारवाई पो.नि. प्रताप दराडे यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. योगीता कोकाटे, उपनिरीक्षक प्रविण पाटील, पो.हे.कॉ. तनवीर शेख, शाहीद शेख, पो.ना. अविनाश वाकचौरे, महिला पोलीस नाईक संगीता बडे, पो.कॉ. दिपक रोहोकले, सत्यजित शिंदे, तानाजी पवार, प्रमोद लहारे, अतुल काजळे, सुरज कदम, सोमनाथ केकान, शिवाजी मोरे, महेश पवार, अभय कदम, अमोल गाडे, याकुब सय्यद, मोबाईल सेलचे पो. कॉ. राहुल गुंडु यांनी केली आहे.