हॉटेलसाठी आकडा टाकून वीज चोरी; गुन्हा दाखल

0
45

नगर – आकडा टाकून हॉटेलसाठी वीज चोरी केल्याचा प्रकार महावितरणच्या भरारी पथकाने उघडकीस आणला. याप्रकरणी महावितरणच्या रूईछत्तीशी कार्यालयातील कनिष्ठ अभियंता वंदना आव्हाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदास दत्तात्रय खकाळ (रा. अंबीलवाडी ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या हॉटेल मालकाचे नाव आहे. खकाळ यांचे नगर-सोलापूर महामार्गावर अंबीलवाडी- मांडवगण फाटा येथे अंबीलवाडी हॉटेल आहे. अभियंता आव्हाड व त्यांच्या भरारी पथकाने २० फेब्रुवारी रोजी सदर हॉटेलमधील वीज चोरी शोधण्यासाठी तपासणी केली असता रोहित्रच्या लघुदाब वाहिनीच्या फेज व न्युट्रलला आकडा टाकून ५० फुट लांबीची काळ्या रंगाची केबल अनाधिकृत जोडून वीज पुरवठा घेतल्याचे आढळून आले. मागील २४ महिन्यापासून महावितरण कंपनीची ८२ हजार ३४४ रूपयांची वीज चोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.