पंतप्रधान स्वयंरोजगार योजनेमार्फत महिला सक्षम करण्याचे काम सरकार करत आहे

0
46

नगर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा महिलांनी लाभ घेतला पाहीजे. पंतप्रधान स्वयंरोजगार योजनेमार्फत महिलांना सक्षम करण्याचे काम केंद्र सरकार करत आहे, मोदी सरकारने केवळ महिलांना सक्षम करण्याचे काम केले नाही, तर महिलांवर अत्याचार करणार्‍यांना फासावर लटकविण्याचे कामही केले. स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांनी सक्षम झाले पाहिजे, महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत, असेच मोदी सरकारचे धोरण आहे. पंतप्रधान महिला स्वयंरोजगार यासारख्या योजना तुमच्यासाठी आहेत, त्याचा लाभ घ्या. आज महिला राजकारणात देखील पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. महिला राजकारणात देखील पुढे आल्या पाहिजेत असे प्रतिपादन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केले. शहरातील टिळक रस्त्यावरील मंगल कार्यालयात आयोजित शक्तीवंदन महिला स्वयंरोजगार मेळाव्यात चित्रा वाघ बोलत होत्या. या मेळाव्यास धनश्री विखे, जिल्ह्याच्या समन्वयक माधुरी पालवे, अहमदनगर शहर समन्वयक सुधा काबरा, महिला मोर्चा अध्यक्ष प्रिया जानवे, गिता गिल्डा, मालन ढोणे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, विनायक देशमुख, सचिन पाररखी, प्रशांत मुथा, पंडित वाघमारे, सविता कोटा, ज्योती दांडगे, रेणुका करंदीकर, श्वेता झोंड, सोनाली चितळे, वंदना ताठे, पल्लवी जाधव, गीता खरमाळे, माया फसले, सुरेखा जंगम, शुभांगी केसकर, संगिता कुलकर्णी, सुवर्णा महापुरुष, सुरेखा खैरे, शारदा ढवण, अश्विनी गायकवाड, रेखा मैड, निता फाटक, स्मिता भुसे, छाया रजपूत, अर्चना बनकर, राखी आहेर, प्रीतम भालेराव, पंडित वंदना,नीता देवराईकर, अनघा रणभोर, प्रतिक्षा रसाळ, योगिता शिवरामे, कुसुम रुद्राणी कृष्णमूर्ती, मीरा महाजन, लता डेंगळे, अर्चना चौधरी, सुवर्णा दुधाट, सुजाता औटी, संध्या पावसे, सर्व बचत गटाच्या महिला व मयूर बोचुघोळ, बाबा सानप, विजय गायकवाड, विशाल खैरे, पंडित खुडे, ज्ञानेश्वर काळे, गोपाल वर्मा, राहुल जामगावकर, रवींद्र बारस्कर, मनोज ताठे, महेश कर्डिले, निलेश सातपुते, राजेंद्र काळे, स्वप्निल बेद्रे, अशोक गायकवाड, अनिल ढवन, बाळासाहेब गायकवाड, संतोष गांधी, सुजय मोहिते, स्वप्निल बेद्रे, रुद्रेश अंबाडे, दत्ता गाडळकर, बंटी डापसे, पप्पू गजै, नितीन शेलार, तुषार पोटे, उमेश साठे, शशिकांत पालवे, सुमित बटुळे, श्रीकांत फंड, डॉ.दर्शन करमाळकर, लक्ष्मीकांत तिवारी, मंगलारप राजू, राजू वाडेकर, सुनील तावरे, राजू वाडेकर, बाळासाहेब गायकवाड, चव्हाण नरेश, अनिल निकम, कुसळकर सचिन, सुनील सकट, संदीप पवार, धिरडे काका, मिनीनाथ मेड पदाधिकारी व महिला मोर्चा पदाधिकारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने करण्यात आली. दुर्गा भजनी मंडळाच्या श्रीराम गीताने वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. तसेच दुर्गा चालिसा नृत्य सादर करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. अल्पसंख्याक कार्यकारिणीतील २५ महिलांची नियुक्तीपत्र चित्रा वाघ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

साहित्यिक आघाडीच्या स्मिता भुसे यांनी मोदींच्या योजनांचे गौरवपूर्ण काव्य सादर केले. खा. सुजय विखे यांच्या प्रयत्नातून बचत गटातील महिलांना पिठाची गिरणी, पॅकिंग मशिन, निर्धुर चुली, वजन काटा, शेवया मशिन असे विविध साहित्य बचत गटातील महिलांना वाटून तसेच उद्योग व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून मदतीचा हात देण्यात आला. मेळाव्यात ४६ महिला बचत गटांना प्रातिनिधीक स्वरूपात स्वयंरोजगाराचे साहित्य देण्यात आले. मेळाव्यासाठी जिल्हाभरातील बचत गटांच्या सुमारे दीड हजार महिला उपस्थित होत्या. यावेळी धनश्री विखे, अ‍ॅड. अभय आगरकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती कुलकर्णी यांनी केले प्रीतम कुलकर्णी यांनी आभार मानले. वंदे मातरमने सांगता करण्यात आली.