स्वस्त धान्य दुकानदारांकडून पांढऱ्या तांदळाचा काळाबाजार

0
58

गोर-गरिबांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न; अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना नागरिकांनी दिले निकृष्ट तांदूळ भेट

नगर – शहरातील स्वस्त धान्य दुकानदारांकडून पांढर्‍या तांदळाचा काळाबाजार सुरु असून देशमुख गल्ली व दिल्लीगेट परिसरातील स्वस्त धान्य दुकानात निकृष्ट दर्जाचे तांदूळ स्वस्त धान्य दुकानदारांकडून लाभार्थ्यांना वितरित करण्यात येत आहे. त्यामध्ये प्लास्टिक तांदूळ तुकडे मिस करून नागरिकांना दिले जाते व त्यांच्या आरोग्याशी खेळण्याचे काम स्वस्त धान्य दुकानदार करत आहे, याबाबत लाभार्थी महिलांनी तक्रार केली. लाभार्थ्यांकडून हाताचे ठसे घेतले जातात मात्र तीन – तीन, चार – चार महिने स्वस्त धान्य वितरित केलेच जात नाही. यामुळे लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ येत आहे, चांगला तांदूळ न देता खराब, कचरा प्लास्टिक मिश्रित तांदूळ नागरिकांना वितरित करण्यात आहे. हा निकृष्ट तांदूळ अन्नधान्य वितरण अधिकारी तहसीलदार सपना भोईटे यांना नागरिकांनी कार्यालयात जाऊन भेट दिला. स्वस्त धान्य दुकानदारांवर तातडीने कारवाई करत काळा बाजार थांबवावा अशी मागणी भाजपचे पदाधिकारी अजय चितळे यांनी केली आहे.

अन्नधान्य वितरण अधिकारी तहसीलदार सपना भोईटे यांना नागरिकांनी निकृष्ट तांदूळ भेट दिले. यावेळी अजय चितळे, सुनील शिंदे, श्रीपाद वाघमारे, अमित पाखले, गणेश आटोळे आदींसह महिला नागरिक उपस्थित होते. सरकारकडून स्वस्त धान्य दुकानदारांना लाभार्थ्यांना वाटण्यासाठी चांगल्या दर्जाचे धान्य येत असते, मात्र संबंधित दुकानदारांकडून या धान्यात भेसळ करत चांगल्या तांदळात प्लास्टिक तांदूळ मिस करण्याचा प्रकार स्वस्त धान्य दुकानदार करत मनमानी कारभार करत लाभार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहे. स्वस्त धान्य दुकानदारांच्या या कृत्यामुळे सरकारविषयी नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे असे मत अजय चितळे यांनी व्यक्त केले आहे.