शहर व उपनगरातील विविध ठिकाणी बंदिस्त, खुल्या व्यायामशाळेच्या कामासाठी निधी मंजूर

0
34

व्यायामाच्या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यास मदत होते : आमदार संग्राम जगताप

नगर – शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाकडून विविध योजनांसाठी निधी मंजूर करून घेतला असून टप्प्याटप्प्याने विकासाची कामे सुरू आहे, याचबरोबर नगर शहरातील नागरिकांचे आरोग्य सदृढ व निरोगी रहावे यासाठी पाठपुरावा करत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध ठिकाणी बंदिस्त व खुल्या व्यायाम शाळेच्या कामासाठी मोठा निधी मंजूर झाला आहे, या माध्यमातून युवकांना व्यायामाची गोडी निर्माण होईल, कोरोना संकट काळामध्ये जीवनात व्यायामाला किती महत्त्व आहे हे समजले असून नागरिक व्यायामाकडे आकर्षित झाले आहे यासाठी त्यांना जागा व साहित्याची गरज असून यासाठी आता बंदिस्त व खुल्या व्यायाम शाळेसाठी लागणारे साहित्य लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहे, या माध्यम ातून नागरिक आपले जीवन आनंदमय जगू शकतात तसेच आजची युवा पिढी व्यसनाधीनतेकडे आकर्षित होत असून त्यांना त्यापासून दूर करण्यासाठी व्यायाम शाळांची खरी गरज असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.

नगर शहरात आ. संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यातून विविध ठिकाणी बंदिस्त व खुल्या व्यायाम शाळेच्या कामासाठी निधी मंजूर झाला असून या माध्यमातून आता अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील केडगाव गावठाण सिटी सर्व्हे नं १६५१ , प्रभाग क्रमांक ७ मधील संभाजीनगर, बोल्हेगाव गावठाण , प्रभाग क्रमांक ४ मधील सावेडी नरहरीनगर गट नं ३९/१ अ सर्व्हे न १४६ ब-१, प्रभाग ४ मधील नवलेनगर सर्व्हे क्र.८०, भिस्तबाग लेखानगर ४७ अ.दत्तमंदिर , प्रभाग क्रमांक १ मधील लेखानगर दत्तमंदिर. प्रभाग क्रमांक १४ मधील साईनगर सर्व्हे नं ३६३/१, प्रभाग क्रमांक १४ मधील साईनगर सर्व्हे नं ३६३/२ , प्रभाग क्रमांक २ मधील शिवनगर, प्रभाग क्रमांक १ मधील भिस्तबाग सर्व्हे नं १० कसबे वस्ती, डॉनबॉस्को कॉलनी, सावेडी, बौध्दवस्ती, बोल्हेगाव गावठाण, हरिजन वस्ती, सर्जे पुरा, इंदिरानगर, केडगाव आदी ठिकाणी बंदिस्त व्यायाम शाळा होणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.