उपायुक्त सपना वसावा यांचे प्रतिपादन; मनपा आयोजित कर्मचारी क्रीडा स्पर्धेमध्ये महिला कर्मचार्यांनी घेतला हिरारीने भाग
नगर – महिला सक्षमीकरणासाठी समाजात विविध उपक्रम आयोजित केले जातात. विविध योजनांच्या माध्यमातून स्त्री सक्षमीकरणा याबाबत बोललं जातं. पण बर्याच वेळा या कार्यक्रमांची चौकट ठरलेली असते. महिला सक्षमीकरणाच्या पारंपरिक चौकटींना छेद देत अहमदनगर महानगरपालिकेने एक नवी सुरुवात केली असून महिलांसाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी अहमदनगर महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचार्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून क्रीडा स्पर्धेसाठी खेळाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. महिलांच्या धकाधकीच्या जीवनामध्ये देखील महिलांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये देखील करिअर करत कर्तृत्वाचा झेंडा फडकवला आहे. खेळाच्या उपजत गुणांना, वाव देण्यासाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजित केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. महापालिकेने महिलांसाठी मैदानी खेळाबरोबरच कॅरम, बुद्धिबळ, जलतरण, धावणे, गोळाफेक, उंच उडी, लांब उडी असे विविध प्रकारच्या स्पर्धा भरविण्यात आल्या आहे. मागील वर्षापेक्षाही यावर्षी अहमदनगर महापालिका कर्मचारी क्रीडा स्पर्धेमध्ये महिलांनी हिरारीने भाग घेत महिलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन उपायुक्त सपना वसावा यांनी केले. वाडिया पार्क येथे अहमदनगर महानगरपालिका आयोजित माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत आयोजित अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात दुसर्या दिवशी क्रिकेट, कॅरम, बुद्धिबळ या स्पर्धा झाल्या. यावेळी उपायुक्त सपना वसावा, क्रीडा अधिकारी फिलिप्स व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.