महिला सरपंचाला टोळक्याकडून मारहाण

0
57

नगर – नगर शहराजवळ असणार्‍या शेंडी (ता.नगर) या गावच्या लोकनियुक्त महिला सरपंच प्रयागा लोंढे यांना गावातील ६ व्यक्तींनी मारहाण केल्याची घटना १५ फेब्रुवारीला सायंकाळी घडली आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या सरपंच लोंढे यांना उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शेंडी ग्रामपंचायतच्यावतीने गावात शोष खड्डा घेण्याचे काम चालू असताना त्या ठिकाणी आलेल्या चार पाच व्यक्तींनी या ठिकाणी हा खड्डा घेऊ नका अशी मागणी केली. त्यावेळी सरपंच लोंढे यांनी ती मागणी तत्काळ मान्य केली व तो केलेला खड्डा पुन्हा बुजवून टाकला. परंतु मनात राग धरून रावसाहेब यादव नेटके, दीपक नेटके, गणेश गोरख ससाणे, बॉबी नेटके, अतुल नेटके, राणा नेटके (सर्व रा. शेंडी) यांनी सरपंच लोंढे यांना शिवीगाळ करत लाथाबुयांनी मारहाण केली. या मारहाणीत सरपंच लोंढे या जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात ६ जणांवर भादंवि कलम ३५४, ३२३, ३२४, ४२७, ५०४, १४३, १४७, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपी रावसाहेब यादव नेटके व गणेश गोरख ससाणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश चाहेर हे करीत आहेत.