बस प्रवासात महिलेच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी

0
100

पुणे बसस्थानक ते केडगाव दरम्यानची घटना; गुन्हा दाखल

नगर – बसमधून लग्नासाठी निघालेल्या महिलेच्या पर्समधील ७० हजाराचे सव्वा दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरले. सदरची घटना सोमवारी (दि. १२) सकाळी पुणे बस स्थानक ते केडगाव दरम्यान घडली असून याप्रकरणी मंगळवारी (दि. १३) कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. नितीन राम गायकवाड (वय ४५, रा. पंचशिलनगर, भिंगार) यांनी फिर्याद दिली आहे. १८ फेब्रुवारी रोजी फिर्यादीच्या मावस भावाचे मुंबई येथे लग्न असल्याने त्यासाठी फिर्यादीची पत्नी व दोन मुले यांना जायचे होते. फिर्यादी यांनी त्यांना सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पुणे बस स्थानकावर सोडले व ते घरी गेले. फिर्यादीच्या पत्नीकडे पर्समध्ये पाऊण तोळ्याचे सोन्याचे डोरले व दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण होते. काही वेळाने मुंबईसाठी जाणार्‍या बसमध्ये फिर्यादीची पत्नी मुलांसह बसल्या व ते केडगावपर्यंत गेल्या असता त्यांनी फिर्यादीला फोन करून सांगितले की, बस प्रवासात डोरले व गंठण चोरीला गेले आहे. दरम्यान त्यांना लग्नासाठी जायचे असल्याने ते मुंबई येथे गेले. फिर्यादी यांनी दुसर्या दिवशी मंगळवारी कोतवाली पोलीस ठाणे गाठून यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.