पारंपारिक मराठी गीतांवर रंगली संगीत मैफल
नगर – मराठा समन्वय परिषदेच्या हळदी-कुंकू कार्यक्रमात सांस्कृतिक व संस्कृतीचा सोहळा रंगला होता. पारंपारिक वेशभूषेत आलेल्या महिलांनी विविध स्पर्धेत सहभाग नोंदवला. कार्यक्रमात निरोगी आरोग्याचा जागर करुन महिलांना आरोग्याचे वाण देण्यात आले. तर यावेळी पारंपारिक मराठी गीतांवर संगीत मैफल रंगली होती. सावेडी येथील गावडे मळा परिसरात झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. संगिता कांडेकर, माजी नगरसेविका दिपाली बारस्कर, मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे, प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा अलकाताई मुंदडा, विद्या बडवे, कमल खेडकर, मनिषा सोनवणे, सविता गांधी, उषा सोनटक्के, मंजुषा सावदेकर, कांता विधाते, प्रतिभा जोशी, संगीता खेडकर, मनीषा वाघ, मिनाक्षी जाधव, दिप्ती मुंदडा, उषा सोनी, लीलावती अग्रवाल, साधना भळगट, प्रतिभा भिसे, इंदूताई गोडसे, हिरा शहापुरे, सुरेखा वाघ, शितल आवारे, जयश्री पुरोहित, निलिमा पवार, राखी जाधव, मनिषा चव्हाण, मिनाक्षी मुनफन, स्वरा मुनफन, ज्योती बेल्हे, योगिता वाघमारे, दीपा गुंड, सोहनी पुरनाळे, औटी आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात अनिता काळे म्हणाल्या की, महिलांच्या सक्षमीकरणासाठी व त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मराठा समन्वय परिषदेच्या माध्यमातून विविध उपक्रम घेण्यात येत आहे. मराठा समन्वय परिषदेच्या माध्यमातून महिला वर्ग मोठ्या संख्येने जोडले गेले असून, त्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. संगिता कांडेकर म्हणाल्या की, सर्व महिलांना एकत्र आणणारा हा उत्सव आहे. सर्व महिला एकमेकींना विचारांची देवाण-घेवाण करत असतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना निरोगी आरोग्याबद्दल करण्यात आलेली जागृतीचा उपक्रम दिशादर्शक असल्याचे ते म्हणाल्या. दिपाली बारस्कर यांनी हळदी-कुंकू कार्यक्रम संस्कृती जोपासण्याचा सोहळा आहे. या सोहळ्याचे महिला वर्ग आतुरतेने वाट पाहत असतात. या कार्यक्रमात एकमेकींसह ऋणानुबंध जोडले जात असल्याचे त्यांनी सांगितले. हळदी-कुंकूच्या सेल्फीपॉइंटने सर्व महिलांचे लक्ष वेधले. तर महिलांनी सेल्फी पॉइंटवर फोटो घेण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी महिलांसाठी विविध मनोरंजन, कौशल्यात्मक व बौध्दिक स्पर्धा रंगल्या होत्या. स्पर्धेत महिलांनी सहभाग नोंदवला. विजेत्या महिलांना उपस्थितांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका कासट यांनी केले. आभार विद्या बडवे यांनी मानले.