गणेश मंदिर परिसरातील गर्दीतून महिलेचा मोबाईल, पाकिट पळविले

0
53

नगर – श्री गणेश जयंती निमित्त माळीवाडा येथील विशाल गणेश मंदिर परिसरात मंगळवारी (दि.१३) झालेल्या गर्दीतून महिलेचा महागडा मोबाईल आणि १० हजारांची रोकड असलेले पाकीट अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत कल्पना गणेशमल धाडीवाल (वय ४९, रा. सोनानगर चौक, सावेडी) यांनी कोतवाली पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. फिर्यादी या अंगणवाडी सेविका असून त्या सरस्वती बचत गट या गटाची सभासद असुन त्या बचत गटाचे पैसे जमा करून शहर बँकेत भरणा करत असतात. मंगळवारी (दि.१३) नेहमी प्रमाणे त्या बचत गटाचा १० हजारांचा भरणा करण्यासाठी बँकेत जात असताना श्री. गणेश जयंती असल्याने माळीवाडा विशाल गणपती मंदिरात आरती चालु असल्याने दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेल्या व मंदिरात खुप गर्दी असल्याने त्या थोडावेळ थांबुन मंदिराच्या बाहेर आल्या व तेथे डोयाला टिळा लावणार्‍या व्यक्तीकडुन डोयाला टिळा लावुन त्याला पैसे देण्यासाठी त्यांनी पर्स मध्ये हात घातला असता त्यांना पर्समध्ये ठेवलेले पॉकेट मिळुन आले नाही. त्यामुळे त्यांनी मंदिरात व मंदिर परिसरात शोध घेतला असता त्यांना पॉकेट सापडले नाही. तेव्हा त्यांची खात्री झाली की कोणीतरी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेवुन त्यांच्या पर्समधुन पॉकेट चोरुन नेले आहे. त्यात १० हजारांची रोकड व २० हजार रुपये किमतीचा मोबाईल होता. याबाबत त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.