हातात ‘तलवार’ घेवून युवकाची गावात दहशत

0
96

नागरदेवळे येथील घटना; पोलीसांना समजताच ठोकल्या बेड्या; गुन्हा दाखल

नगर – नगर शहराजवळ असलेल्या नागरदेवळे गावात एक युवक हातात तलवार घेवून दहशत करत फिरत असल्याची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलिसांच्या पथकाने तेथे जावून त्या युवकास ताब्यात घेत बेड्या ठोकल्या आहेत. सोमवारी (दि.१२) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. सोहेल चॉद शेख (वय २६, रा. नागरदेवळे, ता. नगर) असे त्याचे नाव आहे. भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे स.पो.नि. योगेश राजगुरु यांना गोपनिय माहीती मिळाली की, नागरदेवळे येथे एक इसम हातात धारदार तलवार अवैध्यरित्या घेऊन दहशत करत फिरत आहे. ही माहीती प्राप्त झाल्याने स.पो.नि. राजगुरु यांनी तात्काळ भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अंमलदार व बीट मार्शलचे अंमलदार यांना त्या ठिकाणी जावून कारवाई करण्याचे आदेश दिले. सदर पथक तात्काळ तेथे गेले असता पोलिसांना पाहून तो पळायला लागला. पथकाने त्यास त्याचे हातातील धारदार तलवारीसह शिताफीने ताब्यात घेतले. बेकायदेशीरपणे तलवार बाळगून दहशत केल्या प्रकरणी सोहेल शेख याच्यावर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात आर्म अ‍ॅट ४/२५, महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ११०,११७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु यांचे मार्गदर्शनाखाली स.फौ. कैलास सोनार, रेवननाथ दहिफळे, पो.हे.कॉ. दिपक शिंदे, गणेश साठे, पो. कॉ.अमोल आव्हाड, पो.कॉ. संदीप थोरात यांनी केली आहे.