समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी संभाजीनगर येथे २३ फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी संविधान गौरव महामेळावा

0
40

नगर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाची आढावा बैठक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रा.सुनील मगरे यांच्या उपस्थितीत झाली व संभाजीनगर येथील कापडिया मैदान बाबा पेट्रोल पंप जवळ २३ फेब्रुवारीला घेण्यात येणार्‍या राज्यव्यापी संविधान गौरव महामेळाव्या संदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष प्रा.सुनील मगरे, शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, प्रा.माणिक विधाते, प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब कर्डक, नितीन गायकवाड, साधनाताई बोरुडे, वैभव ढाकणे, अंकुश मोहिते, सिद्धार्थ आढाव, पप्पू पाटील, समिर भिंगारदिवे, येशूदास वाघमारे, राजा जयस्वाल, रोहीत केदारे, ओम भिंगारदिवे, सागर विधाते, सुरेश वैरागर, सतीश साळवे, सुहास पाटोळे, मोना विधाते, ऋषी विधाते, विकास आठवले, आनंद ठोंबे, सुभाष वाघमारे, अक्षय बोरुडे, प्रदीप जाधव, भाऊ भिंगारदिवे, किशोर भिंगारदिवे, प्रदीप भिंगारदिवे, शैला गिरे, रुपाली गायकवाड, रेखा शिंदे, पूजा जगताप आदीसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रा. सुनील मगरे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या अनुषंगाने आरक्षण दिले व विविध सवलती दिल्या व स्वातंत्र्याच्या नंतर समाजामध्ये बदल घडून आला ही क्रांती डॉ. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून घडून आणली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले त्या संविधानावर लोकशाही ची मूल्ये रुजली आहे.

संविधानामुळे आज देशांमध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक असेल व वेगवेगळी भाषा म्हणणारे लोक असतील तरी देखील हा देश एकत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आहे. तसेच लोकांमध्ये गैरसमज झालेला आहे की जे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले ते बदलले जाणार आहे. यामध्ये तोडफोड केली जाणार आहे व आरक्षण बंद होणार आहे. हे गैरसमज लोकांमध्ये पसरलेला असून या संविधान गौरव महामेळावाच्या माध्यमातून व पक्षाची भूमिका देखील सांगायची की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भाजपसोबत गेला असला तरी देखील फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारापासून लांब गेलेला नसल्याची भावना व्यक्त केली व घेण्यात येणार्‍या राज्यव्यापी संविधान गौरव महामेळाव्याला अहमदनगर शहरातून समाज बांधव उपस्थित राहणार असल्याचे आव्हान केले.