अशोक चव्हाण यांचा आमदारकीसह काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा

0
67

मुंबई – काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी (दि.१२) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन आपल्या पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. या घटनेनंतर नाना पटोले तातडीने पक्षश्रेष्ठींची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झालेत. गत अनेक महिन्यांपासून अशोक चव्हाण भाजपत जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. पण त्यांनी या चर्चेत कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले होते. पण आता अचानक त्यांनी विधानसभा सदस्यत्व व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देऊन महाराष्ट्रात एकच खळबळ उडवून दिली. अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर आता ते लवकरच भाजपमध्ये जाहीर प्रवेश करतील असा दावा केला जात आहे.