धिरज जोशी यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करा

0
22

गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहील अशा उपाययोजना पोलसांनी कराव्या : संपत बारस्करनगर शहरातील व्यापारी धिरज जोशी यांच्यावर हल्ला करणार्‍या आरोपींना अटक करा या मागणीचे निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षकांना देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर.

नगर – आजपर्यंत पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये घडणार्‍या गोळीबार, प्राणघातक हल्ले या सारख्या घटनांचे लोन नगर सारख्या शहरापर्यंत पोहचल्याचे दिसुन येत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असुन नगर सारख्या शहरामध्ये सर्व सामान्यांना आजपर्यंत अशा प्रकारच्या घटना केवळ मोठया महानगरांमध्ये घडल्याचे माहित असे परंतु अशा घटना नगर शहरात मोठ्या प्रमाणात सातत्याने घडू लागल्या आहे. हा मोठा चिंतेचा विषय असुन नगरमध्ये गावठी कट्टे, तलवारी अशा प्रकारचे शस्त्रे राजरोसपणे कुठुन उपलब्ध केली जात आहेत. याचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. अशा प्रकारचे गंभीर गुन्ह्यात बेकायदेशीर शस्त्रे सापडून देखील गुन्हेगार दोन चार दिवसात जामीनावर बाहेर असतात हे पोलीस प्रशासनाचे अपयश असुन गुन्हेगारांवर गंभीर स्वरुपाची कलमे लावुन त्यांच्याविरुध्द योग्य पध्दतीने गुन्हा दाखल झाल्यास अशा प्रकारचे जामीन होणार नाहीत गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहील अशा उपाययोजना पोलसांनी कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी केली नगर शहरातील व्यापारी धिरज जोशी यांच्यावरील हल्ला करणार्‍या आरोपीना तातडीने अटक करुन कठोर कारवाई करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली. यावेळी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, प्रा. माणिकराव विधाते, कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष वैभव ढाकणे, युवकचे अध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, युवती अध्यक्ष अंजली आव्हाड, जॉय लोखंडे, सुमित कुलकर्णी, ऋषिकेश ताठे, संजय सपकाळ आदी उपस्थित होते, निवेदनात पुढे नमूद केले की, पुणे येथे नुकताच झालेला सराफ व्यवसायीकावरचा हल्ला, दहीसर येथे अभिषेक घोसाळकर यांची झालेली हत्या, या पार्श्वभूमीवर नगर सारख्या शहरांमध्ये असे गुन्हे होऊ न देणे, हे पोलीस प्रशासनाचे काम असुन याबाबत तातडीने कठोर कारवाई करणे अत्यंत महत्वाचे आहे.आगामी काळात येणारे शिवजयंती, आंबेडकर जयंती यासारखे उत्सव, तसेच लोकसभेच्या निवडणुका या पार्श्वभुमीवर शहरातील सामाजिक शांतता व सौख्य अबाधित राहणे अत्यंत गरजेचे व आवश्यक असुन पोलीस प्रशासनाने याबाबत तातडीने ठोस पावले उचलली पाहिजेत जेणेकरून शहरातील गुन्हेगारांवर वचक बसेल. तसेच शहरात राजरोसपणे फिरणार्‍या विना नंबर गाड्या, काळया काचा असलेल्या चारचाकी वाहने त्याचप्रमाणे शस्त्रे लपवुन फिरणार्‍या मोटार सायकली यांची तपासणी मोहिम राबवुन त्यांच्याविरुद प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्यांना जरब बसवणे आवश्यक आहे. यर नमुद विषयातील व्यापारी धिरज जोशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे सिसिटीही फुटेज असुन देखील गेले दोन दिवसात यात कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे दिसुन येत नाही. हे पोलीस यंत्रणेचे अपयश असुन याबाबत २४ तासाच्या आत संबंधीत आरोपींचा छडा लावुन त्यांना तातडीने अटक करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पोलीस अधिक्षकांना निवेदनातून करण्यात आली.