मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाचे आमदार संग्राम जगताप यांना निवेदन

0
13

मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आ. संग्राम जगताप यांना निवेदन देण्यात आले.

नगर – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्याप्रमाणे मराठा आरक्षण या विषयावर १५ फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलवले असून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत सगेसोयरे या शब्दाच्या व्याख्येबाबत जी अधिसूचना काढलेली आहे ती लागू करून घटनेने पारित करावी यासाठी आपण अधिवेशनामध्ये आवाज उठवावा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज अहमदनगर यांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांना निवेदनाद्वारे केली. यावेळी गजेंद्र दांगट, राम जरांगे, विलास तळेकर, अभय शेंडगे, महेश घावटे, रावसाहेब काळे, दत्ता वामन, गिरीश भामरे, सुधीर दुसुंगे, अशोक डम, परमेश्वर पाटील, संदीप जगताप, सोमनाथ गुंड, संचित निकम, बाबासाहेब रोहोकले आदी उपस्थित होते. यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभेत प्रश्न मांडणारअसल्याचे आश्वासन दिले.