धार्मिक उत्सवातून सर्वधर्मिय हे एकत्र येऊन एकता निर्माण होते : राजाभाऊ कोठारी

0
43

हजरत सय्यद हाजी हमीद शहा रहमतुल्ला आले यांचा संदल उर्स हाजी हमीद ताकिया ट्रस्टच्या वतीने उत्साहात साजरा

नगर – धार्मिक उत्सवातून सर्वधर्मिय हे एकत्र येऊन एकता निर्माण होत असते. उत्सवातून समाजाला दिशा देण्याचे काम होत असते. आज संदल उर्सनिमित्त आयोजित केलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमामुळे परिसरत चांगले धार्मिक वातावरण निमाण झाले आहे, असे प्रतिपादन राजाभाऊ कोठारी यांनी केले. शहरातील सावेडी, सिव्हिल हडको येथील हजरत सय्यद हाजी हमीद शहा रहमतुल्ला आले यांचा संदल उरूस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी राजाभाऊ कोठारी महाराज व पारनेरचे विजय औटी, तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या हस्ते चादर अर्पण करून जगामध्ये शांतता आमन राहावे यासाठी प्रार्थना करण्यात आले. यावेळी हाजी साबिर अली, पोलीस उपनिरीक्षक श्री. मुजावर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माणिकराव विधाते, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक शिवाजी कराळे, सय्यद गालीब अली, चकलंबा शरीफचे मौलाना उपस्थित होते. यावेळी हाजी साबीर अली म्हणाले, संदल उर्सनिमित्त दर्ग्या येथे नात शरीफ धार्मिक प्रवचन करण्यात आले. तसेच संदल उर्स निमित्त दर्ग्यावर व परिसरामध्ये आकर्षित विद्युत रोशणाई करण्यात आली होती. यावेळी भंडार्‍याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच कव्वालीचा कार्यक्रम झाला. हजरत सय्यद हाजी हमीद रहमतुल्ला आले यांचा संदल दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. यामध्ये सर्वधर्मीय भाविक सहभागी होत असल्याचे सांगितले.