वकिल संरक्षण कायद्याची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

0
60

नगर – राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ जिल्ह्यातील वकिलांनी ९ फेब्रुवारीला जिल्हा न्यायालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर घोषणाबाजी करत निषेध महामोर्चा काढला. मोर्चा आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार प्रशासनाच्या सूचनेनुसार बंद करण्यात आल्याने वकील आक्रमक झाले. प्रवेशद्वारावर चढून वकिलांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र त्यानंतर वकिलांच्या शिष्टमंडळाने जाऊन जिल्हाधिकारी सिद्धराम सालिमठ यांना मागण्यांचे निवेदन दिले. अ‍ॅड. राजाराम आढाव आणि अ‍ॅड.सौ. मनिषा आढाव या दाम्पत्याच्या हत्येतील आरोपींना मो क्का लावावा, या खटल्यात सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुेी करावी, सदरचा खटला फास्ट ट ्रॅक कोर्टात चालवावा, वकील संरक्षण कायदा मंजूर करावा आदी मागण्यांसाठी अहमदनगर बार असोसिएशनच्यावतीने शुक्रवारी (दि. ९) सकाळी जिल्हा न्यायालयापासून पायी मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात आ. बाळासाहेब थोरात, आ. संग्राम जगताप, आ. लहू कानडे, आ. सत्यजित तांबे यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते तसेच शहरासह जिल्हाभरातील आणि जिल्ह्याबाहेरील वकील सहभागी झाले होते.

वकिली कोट अन् घोषणाबाजी

मोर्चासाठी एकत्र आलेले सर्व वकील हे काळा कोट आणि पांढरी पँट अशा वकिली पोषाखात होते. मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर वकिलांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. ‘एक वकील, लाख वकील’, ‘अ‍ॅडव्होकेट प्रोटेशन अ‍ॅट मंजूर झालाच पाहिजे’, ‘अ‍ॅड. आढाव हत्याकांडाच्या खटल्यात अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुेी झालीच पाहिजे’, ‘आरोपींना मो क्का लागलाच पाहिजे’ अशा घोषणांनी मोर्चाचा संपूर्ण मार्ग दणाणून गेला.

मोर्चा येताच जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट बंद

जिल्हा न्यायालयापासून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ येताच प्रशासनाच्या सूचनेनुसार पोलिसांनी लोखंडी प्रवेशद्वार (गेट) बंद केले. त्यामुळे मोर्चातील वकील अधिकच आक्रमक झाले. प्रवेशद्वाराला धरून वकिलांनी ते वाजवण्यास सुरुवात केली. काही वकिलांनी प्रवेशद्वारावर चढून घोषणा देत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

शिष्टमंडळाचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन

प्रवेशद्वार बंद केल्याने मोजयाच वकिलांच्या शिष्टमंडळाला जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश देण्यात आला. या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सालिमठ यांना विविध मागण्यांचे निवेदन आ. संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत सादर केले. त्यानंतर सदर निवेदन शासनस्तरावर पाठवून मागण्या मान्य करण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याचे आश्वासन जिल्हाधिकार्‍यांनी दिले. या मोर्चात अहमदनगर बार असो. चे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश गुगळे, उपाध्यक्ष अ‍ॅड. महेश शेडाळे, सचिव अ‍ॅड. संदीप शेळके, खजिनदार अ‍ॅड. शिवाजी शिरसाठ, अ‍ॅड. संजय सुंबे, अ‍ॅड. भेी शिरसाठ, अ‍ॅड. अमोल अकोलकर, अ‍ॅड. स्वरस क्षेत्रे, अ‍ॅड. विनोद रणसिंग, अ‍ॅड. देवदत्त शहाणे, अ‍ॅड. शिवाजी शिंदे, अ‍ॅड. अस्मिता उदावंत, अ‍ॅड. रामेश्वर कराळे, जिल्हा समन्वय समितीचे संदीप पाखरे, लक्ष्मीकांत पठारे, दीपक वाऊत्रे, अजित वाडेकर, अ‍ॅड.रोडे, अ‍ॅड.ठोमसे, अ‍ॅड.मिसळ, अ‍ॅड.डोके, अ‍ॅड.येवले, अ‍ॅड.नितीन दिघे, अ‍ॅड.पठारे यांच्यासह वकील सहभागी झाले होते. यात महिला वकिलांची संख्याही लक्षणीय होती.