अधिवेशनात वकील संरक्षण कायदा मंजूरीसाठी प्रयत्न करणार : आमदार बाळासाहेब थोरात

0
14

नगर – वकिलांच्या मोर्चावेळी बोलताना आ.बाळासाहेब थोरात म्हणाले, संगमनेर तालुका बार असोसिएशनचा सदस्य व आमदार म्हणून मी या महामोर्चास पाठिंबा देत आहे. राहुरीच्या घटनेने सर्व वकिलांमध्ये दहशतीचे वातवरण निर्माण झाले आहे. पुढील काळात वकिलांनी गुन्हेगारांचे वकीलपत्र घ्येयचे कि नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. वकिलांना निर्भीडपणे काम करण्यासाठी राज्य शासनाने वकील संरक्षण कायदा लवकरात लवकर लागू करावा, अशी मागणी केली. यावेळी जळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष रामकांत पाटील म्हणाले, वकिलांनी खासदार, आमदार व मंत्र्यांच्या केसेस चालवणे थांबवावे. त्यामुळे हे लोकप्रतिनिधींना जाग येवून ते वकिलांच्या मागण्या शासनाकडे मांडतील. यावेळी श्रीगोंदा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. मोटे, पाथर्डी बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र खेडकर, नेवासा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. कल्याण पिसाळ, श्रीरामपूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. व्ही. एन.पाटील, कर्जत बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. कैलास शेवाळे, शेवगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. रामदास बुधवंत आदींनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.