राज्यस्तरीय वाचा कौशल्य व चित्रवाचन स्पर्धेत मूकबधिर विद्यालयाची दीपाली तिवारी तृतीय

0
16

नगर – जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालयात दिव्यांगांसाठी राज्यस्तरीय डॉ. कलाताई जोशी स्मृती करंडक-२०२४ वाचा कौशल्य व चित्रवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत येथील अपंग संजीवनी सोसायटीच्या मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थिनी दीपाली दामोदर तिवारी हिने ९ ते १२ वर्षे या वयोगटात तृतीय क्रमांक मिळविला. यावेळी जिल्हा समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, समाजकल्याण कार्यालातील सहाय्यक सल्लागार (दिव्यांग विभाग) दिनकर ताठे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन दीपाली हिला सन्मानित करण्यात आले. तिने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे संस्थेचे चेअरमन मधुकर भावले, संचालिका सौ. विद्या भावले, मुख्याध्यापक डी. के. जगधने आदींनी अभिनंदन केले आहे.