नगर रायझिंग मॅरेथॉनमध्ये अहमदनगर रनर्स क्लबचे शेळके, डॉ मुळे, डॉ तारडे फिनिशर पोडियम ठरले

0
96

नगर – नगर रायझिंग फौंडेशन आयोजित मॅसिमस हाफ मॅरेथॉन उत्साहात, जल्लोषात पार पडली. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक यांच्यासह अहमदनगर रनर्स लबचे धावपटू यामध्ये इंजिनिअर, सी.ए., वकिल, डॉटर्स, व्यवसायिक सहभागी झाले होते. नगर रायझिंग मॅरेथॉनमध्ये अहमदनगर रनर्स लबचे तीन रनर्स पोडियम फिनिशर ठरले. यामध्ये २१ कि.मी. मध्ये संजय शेळके प्रथम, १० कि.मी.मध्ये डॉ.महेश मुळे द्वितीय तर डॉ.शाम तारडे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. या मॅरेथॉनसाठी अहमदनगर रनर्स लबचे चार कॉम्रेड रनर योगेश खरपुडे, जगदीप मकर, गौतम जायभाय, विलास भोजने हे रेस अ‍ॅम्बेसेडर होते. लबच्या सदस्यांनी प्रोत्साहन दिले. यावेळी रनरचा सहभाग वाढविण्यासाठी नावनोंदणी स्टॉलला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, नगर रायझिंग फौंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, अहमदनगर सायकलिंग लबचे गौरव फिरोदिया यांच्यासह अनेक स्टॉलला भेट दिली. यावेळी ‘हम फिट तो नगर फिट’ या टॅग लाईन खाली नवीन मोहिम हाती घेण्यात आली नगरमधील मॅरेथॉनसाठी रनर ची संख्या वाढविण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी अहमदनगर रनर्स लबने नावनोंदणीचे आवाहन केले. अधिक माहितीसाठी योगेश खरपुडे (मो.९५५२५३२८९९) यांच्याशी संपर्क साधावा.