कायदा सुव्यवस्था ढासळल्याने राज्याची वाटचाल बिहारच्या दिशेने

0
21

रासपचे रवींद्र कोठारी यांचा आरोप, वकीलांच्या आंदोलनास पाठिंबा

नगर – वकील हा पक्षकार व न्याय व्यवस्थेतील महत्वाचा दुवा असून, कायद्याचे रक्षक असतात. मात्र अनेकदा त्यांच्यावर प्राणघातक हल्ले होत आहे. राहुरी येथील आढाव दाम्पत्याची हत्या झाली आहे. त्यामुळे राज्यात कायद्याचे रक्षकच आज संकटात आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. कायद्याचा वचक न राहिल्याने आमदारच आता थेट पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार करू लागले आहेत. यावरून राज्याची वाटचाल बिहारच्या दिशेने होत आहे की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. राज्यातील वकील संरक्षक कायद्याची यो१/२य मागणी करत आहेत. यासाठी राज्यभर आंदोलने होत आहेत. राष्ट ्रीय समाज पक्षाने वकिलांच्या या आंदोलनाला जाहीर पाठींबा दिलेला आहे.

राज्य शासनाने त्वरित वकील संरक्षण कायदा अमलात आणावा अन्यथा रासप राज्यभर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलने करेल, असा इशारा राष्ट ्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव रवींद्र कोठारी यांनी दिला. वकील संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी वकिलांचे सुरू असलेल्या धरणे आंदोलनास राष्ट ्रीय समाज पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. पक्षाचे प्रदेश सचिव रवींद्र कोठारी यांनी पाठिंब्याचे पत्र आंदोलनकर्त्या वकिलांकडे दिले. यावेळी वकील संघटनेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड.राजाभाऊ शिर्के, अ‍ॅड.अनिता दिघे, अ‍ॅड. राजेश कावरे, अ‍ॅड.अनुराधा येवले, रासपचे अमोल क्षिरसागर, शहाजी कोरडकर, नेवासा बार असोसिएशनचे अ‍ॅड. नहार अ‍ॅड. संदिप पाखरे, अ‍ॅड. गोरख तांदळे, अ‍ॅड गात, अ‍ॅड.वाडेकर, अ‍ॅड. वाकळे, अ‍ॅड पटारे आदींसह वकील उपस्थित होते.