विविध मागण्यांसाठी वकिलांचा ९ फेब्रुवारी रोजी नगरमध्ये ‘महामोर्चा’

0
21

नगर – अ‍ॅड. आढाव दाम्पत्याच्या हत्येच्या केसमधील आरोपींना मो क्का लावावा व या केसमध्ये अ‍ॅड. उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुेी करावी तसेच अ‍ॅडव्होकेट प्रोटेशन अ‍ॅट या अधिवेशनामध्ये मंजूर करावा आदी मागण्यांसाठी अहमदनगर बार असोसिएशनच्यावतीने ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सर्व वकीलांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. काही दिवसापुर्वी राहुरी येथे घडलेल्या घटनेमध्ये अ‍ॅड. आढाव दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आली त्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी सर्व तालुका वकील संघटना व अहमदनगर शहर वकील संघटना मोर्चामध्ये सामील होणार आहे. सदर मोर्चा अहमदनगर जिल्हा न्यायालयातुन जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाणार असुन निवेदन देण्यात येणार आहे. या प्रमुख मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध महामोर्चामध्ये जिल्ह्यामधील व तालुका बार व राज्यातील वकील बंधु, भगिनी यांनी अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात उपस्थित राहण्याचे आवाहन बार असोसिएशनचे वतीने करण्यात आले आहे.