नगर – अहमदनगर शहरातून जाणार्या स्टेट बँक चौक भिंगार शहापूर रस्त्याचे काम मागील चार वर्षापासून रखडलेले आहे या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे त्यामुळे जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने उपविभागीय अभियंता दि.ना. तारडे यांच्या कार्यालयावर चपलाचा हार घेऊन आंदोलन करण्यात आले होते त्यानंतर पंधरा दिवसात रस्त्याचे तांत्रिकदृष्ट्या उत्तम डांबरीकरणाने खड्डे बुजवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले मात्र दोन महिने उलटून देखील कुठल्याही प्रकारची अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही व नुकतेच २ फेब्रुवारी रोजी सुनील बेरड या शिक्षकाचा अपघाती मृत्यू झाला यापूर्वी देखील याच ठिकाणी एकाच परिवारातील भाऊसाहेब नाटक व त्यांचा मुलगा अजिंय भाऊसाहेब नाटक या बापलेकांनी एकाच खड२ड्यात वर्षभराच्या अंतराने पडून आपला जीव गमावला आहे, त्यावेळी संतप्त गावकर्यासह संघटनेच्या वतीने आंदोलने करण्यात आले होते परंतु त्यानंतरही खड्डे न बुजवील्याने शहापूर येथील सुनील बेरड यांचा खड२ड्यात पडून अपघाती मृत्यू झाला त्यामुळे या मृत्यूसाठी उपविभागीय अभियंता कार्यालयातील अधिकार्यांवर मनुष्यवाधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी करत उपविभागीय अभियंता दि. ना. तारडे यांना आतमध्ये कोंडून कार्यालयास टाळे ठोकण्यात आले. यावेळी जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, उपाध्यक्ष दीपक गुगळे, सचिव अमित गांधी, शहराध्यक्ष शहानवाज शेख, युवक शहराध्यक्ष शहाबाज शेख, सचिन फल्ले आदीसह पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की येत्या पंधरा दिवसात रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर राष्ट ्रीय महामार्ग उपविभागीय अभियंता कार्यालय रेल्वे स्टेशन येथील कार्यालयात एकही अधिकार्याला ऑफिसमध्ये बसू देणार नसल्याचा इशारा देण्यात आला.