सराफ बाजार चौकातील रस्त्याचे काम रखडल्याने व्यापारी त्रस्त

0
40

मालवाहतूक टेम्पो चालक, पायी चालणाऱ्या नागरिकांसमोर अनेक अडचणी

नगर – शहरातील मध्य भागात असणार्‍या मुख्य सराफ बाजार चौकातील रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून रखडल्याने व्यापारी, मालवाहतूक टेम्पो चालक, बाजारात खरेदीसाठी येणारे वाहन चालक, पायी चालणार्‍या महिला, लहान मुलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हा रस्ता खोदून ठेवल्याने आणि खडी टाकल्याने ये-जा करणे मुश्किल झाले आहे. डाळ मंडई, रामचंद्र खुंट, मंगलगेट, जुनी कलेटर कचेरी अशा अनेक भागातून ये-जा करण्यासाठी हा मुख्य चौक आहे. काम करणार्‍या ठेकेदारांनी हे काम अर्धवट सोडल्याने नागरिकांना आपला जीव मुठीत धरून वावर करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन या रस्त्याचे काम सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.