रेल्वे धडकेत नगरमधील युवकाचा जागीच मृत्यू

0
41

नगर – नगर – दौंड रेल्वे मार्गावर अकोळनेर (ता.नगर) गावच्या शिवारात रेल्वे गाडीच्या धडकेत २६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.६) पहाटे घडली. देविदास भानुदास मेहेत्रे (रा. जाधववाडी, अकोळनेर, ता.नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. मयत देविदास हा टँकर चालक होता, तो अविवाहित होता. त्याचा सोमवारी (दि.५) वाढदिवस होता. रात्री त्याने मित्रांसमवेत वाढदिवसही साजरा केला. त्यानंतर रात्री अकोळनेर शिवारात भारत पेट ्रोलियम डेपोच्या जवळील रेल्वेलाईनचे कडेला तो गंभीर जखमी अवस्थेत मिळून आल्याने त्यास खाजगी अ‍ॅम्बुलन्स चालक अक्षय दशरथ पाचारणे (रा. केडगांव) याने पहाटे ४.४० च्या सुमारास नगरच्या जिल्हा शासकीय रु१/२णालयात औषधोपचाराकरीता दाखल केले असता तो औषधोपचारपुर्वीच मयत झाल्याचे मेडीकल ऑफिसर डॉ. कोल्हे यांनी घोषित केले. याबाबतची माहिती जिल्हा रु१/२णालयातील दवाखाना डयूटीवर असलेले तोफखाना पोलिस ठाण्याचे स.फौ. जठार यांनी नगर तालुका पोलिसांना दिली. तालुका पोलिस ठाण्यात याबाबत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.हे.काँ. लगड हे करीत आहेत. मयत देविदास याच्यावर दुपारी अकोळनेर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, २ विवाहित बहिणी असा परिवार आहे.