विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेत ‘जागरण गोंधळ’ घालत आंदोलन

0
61

नगर – विविध विकास कामातील अनियमितता व अतिशय निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करुन जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई करावी व शासकीय सेवेत राहून नियमांचे उल्लंघन करणार्‍यावर बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी ५ फेब्रुवारी रोजी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने जिल्हा परिषदेत जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. वारंवार कारवाई करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असताना प्रशासनाला जाग आणण्यासाठी सदरचे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे, तालुकाध्यक्ष पप्पू कासुटे, पांडुरंग धरम, संजय कोरडे, पप्पू शेटे आदी सहभागी झाले होते. पारनेर तालुयातील हिवरे कोरडा, गोरगाव, माळकुप, काळकुप, वारणवाडी, जांबुत येथील जलजीवन मिशन अंतर्गत कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता होऊन अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे.

तर श्रीगोंदा तालुयातील शिरसगाव बोडखा येथील कामातही अनियमितता झाली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणातील जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई व्हावी, ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील एका नामांकित संस्थेच्या मेहेकरी (ता. नगर) येथील विद्यालयात कार्यरत असलेले कर्मचारी यांना २०१० मध्ये तिसरे अपत्य झाले आहे. त्यांनी महाराष्ट ्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र) नियम २००५ चे उल्लंघन केले आहे. त्या व्येीने ही माहिती लपवून शासनाची फसवणुक केलेली आहे. तसेच तो व्येी नातेवाईकांच्या नावे जेसीबी, ट ्रॅटर, चार चाकी वाहने व डंपर खरेदी करून खाजगी व्यवसाय करत आहे. शासकीय सेवेत असताना खाजगी व्यवसाय करता येत नसताना देखील त्याने सर्व नियमांची पायमल्ली केली असल्याचे स्पष्ट करुन त्याला सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे.