भगवान बाबांच्या विचारांचा वारसा तरुण पिढीने पुढे चालविण्याची गरज :आ संग्राम जगताप

0
22

नगर – नगर ही संतांची भुमी आहे, त्यामुळे आपण या भुमीत जन्माला आलो ही आपले भा१/२य आहे. या संतांनी समाजाला धार्मिकतेतून दिशा देण्याचे काम केले आहे. संत भगवान बाबा व संत वामनभाऊ यांनी आपल्या किर्तन-प्रवचनातून समाजात जागृती केली. विचार कधी थांबत नाहीत, भगवान बाबांच्या विचारांचा, अध्यात्मिक धर्माचा वारसा तरुण पिढीने पुढे चालविण्याची गरज आहे. गेल्या अनेक वषारपासून दरवर्षी सप्ताहाचे आयोजन करुन भगवान बाबा व संत वामनभाऊ यांचे विचार जनमानसात रुजवत आहे. जिल्ह्यात सप्ताहाने चांगली ख्याती निर्माण केली असून, अशा धार्मिक कार्यातून समाजाला दिशा देण्याचे काम होत आहे. धार्मिक कार्यात जगताप परिवाराने नेहमीच पुढाकार घेतला आहे. अध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांच्या मागे आम्ही नेहमीच उभे राहतो. ज्या भागाचे नाव संत भगवान बाबा आहे, त्या भागास कुठलीच कमतरता भासू शकत नाही. हा अध्यात्माचा वारसा असाच पुढे सुरु राहिल, असा विश्वास आ.संग्राम जगताप यांनी व्ये केला. संत भगवानबाबा व संत वामनभाऊ पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त सारसनगर येथे संत भगवानबाबा मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाच्या समारोपप्रसंगी काल्याची दहिहंडी हभप जगन्नाथ महाराज गर्जे यांच्या हस्ते फोडण्यात आली.

सारसनगर येथील संत भगवानबाबा व संत वामनभाऊ पुण्यतिथी सोहळ्याची काल्याची दहिहंडीने सांगता

याप्रसंगी आ. संग्राम जगताप, माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, विपुल शेटीया, दादासाहेब उंडे, झुंबर आव्हाड, म्हातारदेव घुले, देवराम घुले, रामदास बडे, बबनराव घुले, अनिल पालवे, भगवान आव्हाड, उद्धव ढाकणे, मच्छिंद्र दहिफळे, अजय कर्हाड, अंकुश वायभासे आदी उपस्थित होते. याप्रसंगी हभप जगन्नाथ महाराज गर्जे यांनी किर्तनातून आध्यात्म हे आपल्या जीवनाचा एक भाग आहे. मन:शांतीसाठी भगवंतांचे नामस्मरण आवश्यक आहे. आपल्या दु:खाचे निराकरण करण्याची ताकद नामस्मरणात आहे. सप्ताहानिमित्त अखंड हरिनामाचा जाप केल्याने आपल्यात एक प्रकारे ऊर्जा निर्माण होत असते. त्यासाठी प्रत्येकाने भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे. याप्रसंगी गणेश भोसले, प्रकाश भागानगरे आदिंनी मनोगत व्ये केले. सूत्रसंचालन बबन घुले यांनी केले तर आभार अनिल पालवे यांनी मानले. या सप्ताह काळात महाराष्ट ्रातील नामवंत किर्तनकार, प्रवचनकार यांनी आपली सेवा दिला. सप्ताहांतर्गत दररोज पहाटे काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, सायंकाळी हरिपाठ व रात्री किर्तन असे दैनंदिर कार्यक्रम झाले. महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली. सप्ताह यशस्वीतेसाठी श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठान ट ्रस्ट व भे मंडळ पंचक्रोशी यांनी परिश्रम घेतले. सप्ताहाचे हे १६ वे वर्ष होते.