नगरमधून दीड लाखांचे मोबाईल चोरणाऱ्याला रायगडमध्ये पकडले

0
77

नगरमधून दीड लाखांचे मोबाईल चोरणार्‍याला मुद्देमालासह पकडल्यानंतर त्याच्या समवेत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक.

नगर – नगरच्या केडगाव बायपास चौकातून २ अ‍ॅपल कंपनीचे आयफोन व १ विवो कंपनीचा मोबाईल चोरून नेणार्‍या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रायगड जिल्ह्यातील खालापुर येथे पकडले असून त्याच्या ताब्यातून चोरलेले दीड लाख रुपये किंमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. ज्ञानेश्वर तुकाराम जाधव (वय ४३, रा. विणेगांव, ता. खालापुर, जि. रायगड) असे या आरोपीचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, शुभम कुंडलिक वाफारे (वय २२, रा. कर्जुले हर्या, ता. पारनेर) हे ट्रान्सपोर्टची गाडी घेवुन नगरहून मुंबई येथे जात असतांना त्यांचा कंटेनर केडगांव बायपास या ठिकाणी नादुरुस्त झाला त्यामुळे ते शोरुम मध्ये गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने वाफारे व त्यांचे मित्राचे २ अ‍ॅपल कंपनीचे आयफोन व १ विवो कंपनीचा मोबाईल चोरुन नेले होते. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सदर मोबाईल हे खालापुर, जि. रायगड येथील आरोपी ज्ञानेश्वर जाधव याने चोरी केले असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यामुळे पो.नि.दिनेश आहेर यांनी पो.हे.कॉ. संदीप पवार, पो.ना. रविंद्र कर्डिले, भिमराज खर्से, पो.कॉ.अमृत आढाव, प्रशांत राठोड व चालक पो. हे.कॉ. संभाजी कोतकर यांच्या पथकाला कारवाई साठी पाठविले. या पथकाने रविवारी (दि.४) खालापुर (जि. रायगड) येथे जावुन आरोपी ज्ञानेश्वर जाधव यास पकडले. त्याने गुन्ह्याची कबुली देत चोरलेले मोबाईल काढून दिले आहेत. या आरोपीला नगरला आणून कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. नगर – केडगाव देवी परिसरातील विजेचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी २०० के.व्ही. चा ट्रान्सफार्मर बसविण्याच्या कामाचा शुभारंभ उद्योजक सचिन (आबा) कोतकर यांच्या हस्ते झाला. केडगाव देवी परिसराचा विस्तार झपाट्याने झाला असताना वाढलेली विजेची मागणी व कमी दाबाच्या पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त होते. अनेकवेळा वीज पुरवठा खंडित होत असल्याने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निधीतून नवीन ट्रान्सफार्मर बसवून हा प्रश्न सोडविण्याचे काम सुरु झाले आहे. या उद्घाटनासाठी उद्योजक जालिंदर कोतकर, नगरसेवक मनोज कोतकर, सुनीलमामा कोतकर, राहुल कांबळे, गणेश नन्नवरे, महेंद्र कांबळे, इंजि. प्रसाद आंधळे, रावसाहेब मतकर, बच्चन कोतकर, श्याम कोतकर, सोपानराव कोतकर, मच्छिंद्र कोतकर, भूषण गुंड, अशोक कराळे, अनिल ठुबे, सुमित लोंढे, सागर सातपुते, गणेश सातपुते, पोपट ठुबे, सुरज शेळके, पोपट कराळे, महेश कोतकर, केतन भंडारी, योगेश कोतकर, सुरेश झरेकर, नवनाथ कोतकर, जमदाडे सर, सोपानराव कोतकर, किशोर कोतकर, उमेश कोतकर यांच्यासह विद्युत महावितरणचे कर्मचारी व केडगाव ग्रामस्थ उपस्थित होते. जालिंदर कोतकर म्हणाले की, केडगावमध्ये शहरीकरण झपाट्याने वाढत आहे. शहराचा सर्वात मोठा उपनगर म्हणून केडगावचा विस्तार सुरु आहे. केडगाव देवी परिसरात देखील लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली असून, त्यांना विजेचा मोठा प्रश्न भेडसावत होता. कमी दाबाने वीज पुरवठा व अवेळी वीज खंडित होत होती. हा प्रश्न खासदार डॉ. विखे यांच्या प्रयत्नाने सोडविण्यात आला आहे. परिसरातील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असून, उन्हाळ्यात त्यांना त्रासाला सामोरे जावे लागणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केडगाव उपनगरातील घटना; चौघांवर गुन्हा दाखल नगरमधून दीड लाखांचे मोबाईल चोरणार्‍याला मुद्देमालासह पकडल्यानंतर त्याच्या समवेत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक.