जिल्हा न्यायालयातील कामकाज सुरळीत होणार

0
15

राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या निर्घुण हत्येच्या निषेधार्थ वकील संघटनांनी सुरु केलेले कामकाज बंद आंदोलनानंतर शुक्रवारी (दि.२) मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनाच्या वेळी विधी व न्याय विभाग सचिव सुवर्णा केवले यांनी वकील संघटनेच्या सर्व मागण्या शासन स्तरावर मांडून त्या मान्य करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे वकील संघटनेचे स्थगित करण्यात येणार असून सोमवार पासून न्यायालयातील कामकाज सुरळीत सुरु होणार असल्याचे संघटनेचे सेक्रेटरी संदीप शेळके यांनी सांगितले. वकील संघटनेच्या विविध मागण्यांबाबत आझाद मैदानात झालेल्या आंदोलनात नगरसह राज्यभरातील संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनाला यश आले असून सर्व मागण्या लवकरच मान्य होणार असल्याचे शेळके यांनी सांगितले. या आंदोलनात शेळके यांच्यासह नगरमधील ३० ते ४० वकील उपस्थित होते.