कारागृहातून रजेवर सुटलेला कैदी फरार

0
70

नगर – एका गुन्ह्यात श्रीगोंदा तालुयातील विसापूर येथील खुल्या कारागृहात शिक्षा भोगणारा नगर शहरातील कैदी २८ दिवसांच्या संचित रजेवर बाहेर आल्यानंतर तो पुन्हा कारागृहात हजर न होता पसार झाला आहे. प्रदीप जनार्दन कोकाटे (रा. थ्री. डी. कॉर्नर, शिवाजीनगर, तपोवनरोड, अहमदनगर) असे या कैद्याचे नाव असून त्याच्यावर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विसापूर कारागृहातील पोलिस कर्मचारी निलेश भिमराज पालवे यांनी याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिक्षा भोगणारा कैदी प्रदीप जनार्दन कोकाटे १ जानेवारी पासून २८ दिवसांच्या संचित रजेवर बाहेर आला होता. त्याला सदर रजा पूर्ण होताच ३० जानेवारीला खुले कारागृह विसापुर येथे हजर राहण्याबाबत लेखी व तोंडी समज देण्यात आलेली होती. तरी देखील सदर आरोपी हा खुले कारागृड विसापुर येथे हजर झाला नसल्याने व अनधिकृतपणे कारागृह येथे गैरहजर असल्याने त्यांच्या विरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून पोलिसांनी भा.दं.वि. कलम २२४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे