प्रभागाच्या विकासात भर टाकणारी कामे झाली : ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष के. डी. खानदेशी

0
95

प्रभाग क्र.१५ मधील स्वीट कॉर्नर (विरंगुळा मैदान) ते गड्डम घर येथील रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ

माजी नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्या विकास निधीतून प्रभाग क्र.१५ मधील स्वीट कॉर्नर (विरंगुळा मैदान) ते गड्डम घर येथील रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ माजी महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते झाला.

आगकर मळा परिसरात गेल्या काही वर्षांत विकास कामांच्या माध्यमातून प्रभागाचा चांगल्या पद्धतीने विकास झाला आहे. प्रत्येक भागातील रस्ते, पिण्याची पाईपलाईन, ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट याबरोबर प्रभागाच्या विकासात भर टाकणारी कामेही झाली आहे. ओपन स्पेसचा विकास, त्याचबरोबर विरंगुळा मैदानाचा सर्वांगिण विकास केल्याने मुले, महिलांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी सोय झाली आहे. आता या भागातील आगरकर मळा परिसरातील प्रमुख रोडचे डांबरीकरण होत असल्याने नागरिकांची मोठी सोय झाली आहे. आपल्या भागातील कामे होण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधींना आपल्या प्रश्नांबाबत कळविले पाहिजे. माजी नगरसेविका सुवर्णाताई जाधव या नेहमीच नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांचे प्रश्न सोडवित आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष के.डी.खानदेशी यांनी केले. माजी नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्या विकास निधीतून प्रभाग क्र.१५ मधील स्वीट कॉर्नर (विरंगुळा मैदान) ते गड्डम घर येथील रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी के.डी.खानदेशी, जे.डी.खानदेशी, शहरप्रमुख संभाजी कदम, माजी सभापती गणेश कवडे, नगरसेविका सुवर्णा जाधव, प्रशांत गायकवाड, दत्ता जाधव, दिपक खैरे, अशोकराव कानडे, देवकी भापकर, सौ.मिरा महाजनी, पुष्पा महाजन, उल्हास मुळे, अरुणराव औटी, श्रीकृष्ण नगरकर, विजय कुलकर्णी, त्र्यंबक कर्‍हाड, नूरआलम शेख, केशव पित्रोडा, व्ही.बी. मुळे, जवाहरलाल पोखरणा, हिंमतलाल पिपाड, गड्डम, भोसले, बारसे, बी.आर.गोरे, विलास आहेर, कैलास जमदाडे, विजय साळूंके, शिवाजी गाडळकर, ओंकार शेळके, आकाश गाडळकर, संकेत देशमाने, निर्मल साठे आदि उपस्थित होते. यावेळी बोलतांना महापौर रोहिणी शेंडगे म्हणाल्या की, प्रभाग १५ मध्ये माजी नगरसेविका सुवर्णाताई जाधव यांनी या भागात विकास कामांबरोबर नागरिकांसाठी विविध उपक्रम नेहमीच राबवत असतात. त्यामुळे हा प्रभाग आदर्शवत असाच झाला आहे. यावेळी सुवर्णा जाधव म्हणाल्या, प्रभागाच्या सर्वांगिण विकासासाठी आपण सर्वोतोपरि प्रयत्न केले. नागरिकांच्या अडचणी समजावून घेत त्या सोडविल्या. त्यासाठी विविध निधीच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांना मुलभुत सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर महिलांसाठी हळदी-कुंकू, बचत गटांचे मेळावे, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीरे, बालकांसाठी बाल मेळावा अशा उपक्रमातून सर्वांगिण विकास साधला जात आहे. कार्यकाळ संपला असला तरी नागरिकांच्या प्रश्नांसाठी कायम तत्पर राहणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी संभाजी कदम, गणेश कवडे, जे.डी.खानदेशी, दिपक खैरे, प्रशांत गायकवाड आदिंनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता जाधव यांनी केले तर आभार बी.आर.गोरे यांनी मानले.