नगरमधील महिला भाविकांचा धमाल झिम्मा, मध्यप्रदेश, गुजरातमधील तीर्थस्थळांना भेटी

0
53

कुटुंब सोबत नसताना सगळ्या जणींनी लुटला तब्बल २१०० कि.मी प्रवासाचा आनंद

उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिर, आयुष्यातील सर्व मनोकामना पूर्ण करणारी दादा मणीभद्र स्वामींची तीन मंदिरे, गुजरात येथील शंकेश्वर पार्श्वनाथ मंदिरासह अनेक तीर्थक्षेत्री श्रद्धापूर्वक दर्शन, शुद्ध तुपाच्या सुकडीचा प्रसाद, सात्विक नाष्टा, भोजन आणि चार दिवसात तब्बल २१०० किलोमीटर प्रवासातील धमाल मस्ती, आनंद आणि अनुभवाचा अद्भुत ठेवा मनात साठवून नगरम धील विविध वयोगटातील महिला भाविकांनी मैत्रीची वीण घट्ट करीत तीर्थक्षेत्र दर्शनाचा आनंद लुटला. झिम्माच्या कथानकाप्रमाणे प्रथमच कुटुंबाशिवाय इतकी मोठी ट ्रीप सवारनी चांगलीच एन्जॉय केली. आनंद ट ्रॅव्हल्सच्या आलिशान आराम बसमधून चालक शुभम यांनी उत्तम सारथ्य करीत सवारना सुखरूप प्रवास घडवला. प्रथमेश भंडारी, यश मुथा, सिद्धी मुथा यांनी अतिशय छान नियोजन करून भाविक महिलांना कसलीच अडचण न होता अतिशय मस्त वातावरणात ट ्रीपचा आनंद मिळवून दिला. सुवर्णा मुथा, अलका मुथा, सुषमा मुथा, शोभा मुथा, प्रेरणा शिंगवी, संगीता बोगावत, स्वाती गांधी, शिल्पा राठोड, स्वाती चंगेडिया, अंजली गुगळे, प्रिया बोरा, स्मिता गांधी, वैशाली देसरडा, स्वाती मुनोत यांचे सूर नगरमधून निघतानाच सुरेल पद्धतीने जुळले. प्रथमच घरचे बरोबर नाहीत, संसाराच्या रोजच्या कर्तव्यांचा ताण नाही आणि सर्वात महत्वाचे विविध तीर्थस्थळे पाहण्याची, दर्शन घेण्याची इच्छा आणि इतया मोठ्या प्रवासाची उत्सुकता प्रत्येकीच्या मनात होती. नगरमधून निघाल्यावर पहिली भेट मध्य प्रदेश उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात. नव्याने झालेला मंदिर परिसर अतिशय सुंदर होता. नंतर उज्जैन येथीलच येथीलच दादा मणीभद्रस्वामी जैन मंदिर व त्या ठिकाणीच असलेले पद्मावती माता मंदिर, तिथून काही किलोमीटर अंतरावरील मणीभद्रस्वामींची हवेली येथे श्रद्धेने दर्शन घेतानाच मन्नतचा धागा बांधला व शुद्ध तूप व नारळ तोरण अर्पण केलं व शुद्ध गव्हाच्या पिठाचा (सुकडी) प्रसादाचे ग्रहण सवारनी मनोभावे केले. उज्जैन नंतर सगळ्या महिला उत्साहात गुजरात मध्ये आगलोड येथे दाखल झाल्या.

येथील जैन तीर्थ मणीभद्रस्वामी मंदिरात दर्शन, मगरवाडा येथील तिसरे मणीभद्रस्वामी मंदिरात दर्शन, शंकेश्वर पार्श्वनाथ मंदिर दर्शन मोहडी येथील घंटाकर्ण महावीर स्वामी मंदिर दर्शन. अशा तीर्थटनात मणीभद्रस्वामींच्या तीन मंदिरांचे दर्शन खूप विशेष ठरले. कारण मणीभद्रस्वामींच्या मनोभावे दर्शनाने जीवनातील आरो१/२य, नैराश्य, व्यापार, धनसंपत्ती, संकट निवारण अशा विविध समस्या हमखास दूर होतात अशी श्रद्धा आहे. प्रत्येक मंदिर स्थळी धर्मशाळेत राहण्याची अतिशय उत्तम सोय आणि शुद्ध सात्विक भोजनाचा आस्वाद घेतला. हा समृद्ध करणारा अनुभव घेऊन सवारनी अहमदाबाद येथे प्रसिद्ध कॉटन मार्केटला भेट देत कपडे खरेदी केली तसेच ढोकळा, प्रसिद्ध फाफडा जिलेबीचा आस्वाद घेतला. येथून मग परतीचा प्रवास सुरू झाला आणि तोही सवारनी अतिशय मजेत एन्जॉय केला. प्रवासात तंबोला गेम्स, अंताक्षरी, डान्सचा आनंद लुटताना पाच दिवस कसे सरले हे कळलंच नाही. सवारचे अतिशय भावनिक बॉण्डींग जुळले, ओळख होतीच पण प्रत्येकीला जिवलग मैत्रिणी मिळाल्या. पुन्हा संधी मिळाली तर परत अशीच ट ्रीप काढण्याचे ठरवत सगळ्या जणींनी एकमेकांचा निरोप घेतला. आणि हो जातांनी सवारनी आवर्जून ड ्रायव्हर शुभम दादाचे आभार मानले. आनंदधाम येथे दाखल झाल्यावर सिद्धी गांधी यांनी संघपूजन केले.

अलका मुथा (शब्दांकन : स्वाती प्रमोद गांधी)