अहमदनगर शहर पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा पूर्ववत सुरु

0
41

अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात स्वत…ला कोंडून लाईट बंद करत केले आंदोलन; अधिकाऱ्यांची हिटलरशाही चालून देणार नाही : जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर

नगर – अहमदनगर महापालिकेच्या वतीने मुळा धरणावरून शहराला पाणी पुरवठा करणारा वीज पुरवठा थकीत वीजबिलासाठी महावितरणने खंडित करून २४ तास उलटून गेले आहे, यावर अद्याप काही तोडगा निघाला नाही त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून सुमारे ७ लाख लोकांना मनपा व महावितरण कार्यालयाच्या वतीने वेठीस धरण्याचे काम केले असल्याने राष्ट ्रवादी काँग्रेस व मनपाचे माजी पदाधिकारी व नगरसेवक यांनी महावितरण कार्यालयात जाऊन अधीक्षक अभियंता यांच्या दालनात स्वत…ला कोंडून लाईट बंद करत आंदोलन केले आहे, त्यामुळे अधिकार्‍यांनी तातडीने मुळा धरण येथील वीज पुरवठा सुरु करत शहराचा पाणी पुरवठा सुरळीत केला आहे. यापुढे शहराचा पाणी पुरवठा बंद करण्याचा प्रयत्न करू नये अधिकार्‍यांनी नागरिकांना वेठीस धरण्याचे काम करू नये, प्रशासकीय पातळीवर तुम्ही पाठपुरावा करा तसेच यापुढे अधिकार्‍यांची हिटलरशाही चालून देणार नाही असा इशारा राष्ट ्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी दिला आहे.

शहराला पाणी पुरवठा करणारा वीज पुरवठा सुरु करण्यासाठी राष्ट ्रवादी काँग्रेस व मनपाचे माजी पदाधिकारी व नगरसेवक यांनी अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात स्वत…ला कोंडून लाईट बंद करत आंदोलन केले. यावेळी संपत बारस्कर, प्रा. माणिक विधाते, माजी नगरसेवक निखिल वारे, विनित पाऊलबुधे, अजिंय बोरकर, प्रकाश भागानगरे, बाळासाहेब पवार, डॉ.सागर बोरुडे, इंजि. केतन क्षिरसागर आदींसह कार्यकर्ते व मनपाचे अधिकारी उपस्थित होते, राष्ट ्रवादी काँग्रेस पक्ष मनपाचे माजी पदाधिकारी व नगरसेवक यांनी आयुे यांच्या दालनात जाऊन जाब विचारत म्हणाले की, २४ तास उलटले असून महावितरणने पाणी पुरवठा सुरळीत केला नाही यावेळी आयुेांनी सांगितले की, महावितरणला मनपाच्या वतीने २६ कोटी रुपये भरले असून फे १ महिन्याचे वीजबिल थकीत आहे, सध्या मराठा आरक्षण संदर्भात सर्वेक्षणासाठी मनपाचे कर्मचारी काम करत असल्याने वसुलीवर परिणाम होत आहे.

अधिकार्‍यांची मनमानी : निखिल वारे

सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार व महसूल मंत्री असताना देखील महावितरणच्या अधिकार्‍यांनी त्यांच्याकडे कोणताही संपर्क न साधता अधिकार्‍यांनी मनमानी करत नगर शहराचा पाणी पुरवठा खंडित केला आहे, अधिकार्‍यांनी आधी चर्चा करून प्रश्न मार्गी लावणे गरजेचे होते, यापुढील काळात अधिकार्‍यांची मनमानी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा माजी नगरसेवक निखिल वारे यांनी दिला, राष्ट ्रवादी काँग्रेस पक्ष व मनपाचे माजी पदाधिकारी व माजी नगरसेवक यांनी विद्युत विभागाच्या अधिकार्‍यांना कोंडून ठेवले यावेळी नगरसेवक आक्रमक झाल्याचे निदर्शनास येताच अधिकार्‍यांनी वरिष्ठांशी संपर्क साधत मनपाचा मुळा धरणावरील पाणीपुरवठा सुरळीत केला.