क्लोन कार्डचा वापर करून पोस्टाच्या एटीएममधून लांबविले ६८ हजार रुपये

0
35

अज्ञात व्यक्ती विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

नगर – लोन कार्डचा वापर करून पोस्ट ऑफिसच्या एटीएम मधून वेळोवेळी ६८ हजार रूपये अज्ञात व्येीने काढून घेतल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी प्रभारी वरिष्ठ पोस्टमास्तर संजय पांडुरंग बोंदर्डे (वय ५८, रा. नायकुनगर, भिंगार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्येी विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीपीओ चौकातील प्रधान डाक घराच्या आवारात एटीएम मशीन असून त्यामधून पोस्टाच्या खातेदारांसह अन्य बँकेच्या खातेदारांनाही पैसे काढता येतात. याच एटीएम मशीनमध्ये पोस्टाच्या व्यतिरिे अन्य बँकेच्या बनावट एटीएम कार्डचा वापर करून ८ जानेवारी रोजी अज्ञात व्येीने एकाच दिवशी सात वेळा पैसे काढले. एकुण ६८ हजार रूपये काढून पोस्टाची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान डाकघर नगर विभागाचे वरिष्ठ अधीक्षक यांनी ३० जानेवारी रोजी पत्र दिल्यानंतर प्रभारी वरिष्ठ पोस्टमास्तर संजय बोंदर्डे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस अंमलदार इनामदार करीत आहेत.