वकील संघटनांच्या आंदोलनास ‘आरपीआय’ आठवले गटाचा पाठिंबा

0
12

वकील दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ वकील संघटनेच्यावतीने सुरू असलेल्या  आंदोलनास पाठिंबा देताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे व पदाधिकारी.

नगर – राहुरी येथील अ‍ॅड. राजाराम आढाव व त्यांच्या पत्नी अ‍ॅड. सौ. मनिषा आढाव यांच्या हत्येचा अहमदनगर डिस्ट्रीट नोटरीज असोसिएशनच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला असून अहमदनगर वकील संघटना तसेच जिल्ह्यातील सर्व वकील संघटना यांनी पुकारलेल्या न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अहमदनगर शहर व जिल्ह्याचे वतीने जाहीर पाठींबा देत असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे यांनी सांगितले. तसेच या दुर्दैवी घटनेमुळे अ‍ॅडव्होकेट प्रोटेशन अ‍ॅट बाबत देखील ठोस कारवाई करणे आवश्यक असल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे शिष्टमंडळ केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांना भेटून अ‍ॅडव्होकेट प्रोटेशन अ‍ॅट आणखी कडक करण्यात यावा यासाठी मागणी करणार आहे व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील विनंती करणार आहोत असेही त्यांनी सांगितले. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे, युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल कांबळे, तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, जयराम आंग्रे, प्रतीक नरवडे, गौरव साळवे आदी उपस्थित होते.