जिल्हा बार असोसिएशनच्या आंदोलनाला आमदार संग्राम जगताप यांचा पाठिंबा

0
69

माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांनी घेतली आंदोलकांची भेट

नगर – राहुरी शहरातील वकील दांपत्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तात्काळ पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली व तपासाची चक्रे वेगाने फिरवली. त्यानंतर यातील पाच आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा बार असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तर ३ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयाच्या कामकाजापासून अलिप्त राहून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला आमदार संग्राम जगताप यांनी पाठिंबा जाहीर केला असून, माजी जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. सचिन जगताप, राष्ट्रवादीचे माजी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, अभिजीत खोसे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. यावेळी सचिन जगताप म्हणाले की, शहरासह जिल्ह्यात वकिलांवर हल्ल्याचे प्रमाण वाढत असून, या गोष्टी निषेधार्ह आहेत. वकिलांसाठी असलेल्या अ‍ॅडव्होकेट प्रोटेशन अ‍ॅटच्या त्रुटी सरकारने दूर करून हा कायदा लवकरात लवकर लागू करावा.

या प्रकरणातील जे कोणी फिर्यादी असतील, त्यांनाही पोलिसांनी संरक्षण द्यावे व इतर सरकारी वकिलांनीही या प्रकरणात लक्ष घालून आरोपींवर कडक कारवाई कशी करता येईल, हे पहावे. आगामी अधिवेशन काळात शहराचे आम दार संग्राम जगताप हे याबाबत विधान भवनात प्रश्न उपस्थित करणार असून आरोपींना शिक्षा मिळून देण्यासाठी प्रयत्न करतील. यावेळी प्रा. माणिकराव विधाते म्हणाले की, राहुरी येथे घडलेली घटना अत्यंत दुःखदायक असून, आपल्या वकिलीमार्फत सेवा देण्याचे काम वकील बंधू आणि भगिनी करत असतात. आज त्यांच्याबाबतच ही दुःखद घटना घडली हे अत्यंत लेशदायी आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील वकील असून, त्यांनी या प्रकरणातील गांभीर्य ओळखून योग्य ती कारवाई करावी.