दैनिक पंचांग बुधवार, दि. ३१ जानेवारी २०२४

0
36

शके १९४५ शोभननामसंवत्सर, पौष कृष्णपक्ष, हस्त २५|०८ 
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. २८ मि.

राशिभविष्य


मेष : आज आपणास आपल्या विचारांबरोबर एकटे राहून आपले दैनंदिन
कार्यक्रम थांबविणे आवश्यक आहे.

वृषभ : एखाद्या मित्राशी झालेली भेट दिलासा देईल. कौटुंबिक समस्या निर्माण
होण्याची शयता आहे.

मिथुन : आज वादांमुळे आपणास निष्कारण ताण असल्याचा अनुभव येईल.
कौटुंबिक पाठिंबा देखील मिळणार नाही.

कर्क : आर्थिक विषयांमध्ये आपले प्रयत्नआपणास यश मिळण्याचे कारण ठरतील.

सिंह : आज आपणास कठोर श्रम करावे लागेल. काही निष्कारण चिंतांमुळे आपली
व्यग्रता वाढेल.

कन्या : आजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा चांगला नसेल. मित्रांमध्ये होणारे
वाद आपल्या संबंधासाठी वाईट ठरतील.

तूळ : आरोग्याची काळजी घ्या. व्यस्त राहाल. कौटुंबिक विषयांमध्ये पैसा खर्च
होईल.

वृश्चिक:  एखाद्या जीवलगाबरोबरभागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध
वाढविण्याचा प्रयत्न करा.

धनु:  चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल.

मकर: काळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य
घेऊन चालावे.

कुंभ:  हातावर हात ठेवल्याने कोणतेहीकार्य होत नाही.

मीन: शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेटची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य
विचार करा.

संकलक: अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.