राज्यस्तरीय स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्याचा फुटबॉल संघ जाहीर

0
70

नागपूरच्या राज्यस्तरीय खुल्या पुरुष गटात करणार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व, २० खेळाडूंसह दोन राखीव खेळाडूंचा समावेश

नागपूरच्या राज्यस्तरीय खुल्या पुरुष गटात सहभागी होणारे नगर जिल्ह्याचे फूटबॉल खेळाडू समवेत व्हिटर जोसेफ, प्रदीपकुमार जाधव, खालिद सय्यद, राजेंद्र पाटोळे आदी.

नगर – अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय खुल्या पुरुष गटातील फुटबॉल स्पर्धेसाठी जिल्ह्याचा संघ निवडला आहे. नुकतेच जिल्हा निवड चाचणी स्पर्धा भुईकोट किल्ला मैदान येथे पार पडली. या निवड चाचणीतून खेळाडूंची जिल्ह्याच्या संघात निवड करण्यात आली असून, नागपूर येथे होणार्‍या राज्यस्तरीय खुल्या पुरुष गटातील फुटबॉल स्पर्धेत निवड झालेले खेळाडू अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. जिल्ह्याच्या फुटबॉल संघाचे २० खेळाडूंसह दोन राखीव खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यामध्ये रोनक दिपक जाधव, ओम भास्कर महांडुळे, योगेश बाळासाहेब चेमटे, रितेश मनोज रणमाळे, कुणाल कैलास नाडे, अतुल राजेंद्र नकवाल, शशांक जितेंद्र वाल्मिकी, अभय नितीन साळवे, अरमान रशिद फकिर, ओम राहुल म्हस्के, फैजान कासीफ खान, सर्फराज अल्लाहबक्ष खर्चे, रिशी सुभाष कनोजिया, रितीक प्रेमचंद छजलाने, कुणाल मंगल छजलाने, हिमांशु विनोद थोरात, कृष्णा विलास चव्हाण, जोनाथन व्हिटर जोसेफ, सुयोग गौतम महागडे, अरमान इबाल शेख तर राखीव खेळाडू स्वराज राजाभाऊ वाघमारे व सार्थक राजेंद्र भोसले यांचा समावेश आहे. या खेळाडूंची निवड असोसिएशनचे सहसचिव व्हिटर जोसेफ, सहसचिव प्रदीपकुमार जाधव, उपाध्यक्ष खालिद सय्यद व कार्यकारी सदस्य राजेंद्र पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. जिल्हा निवड चाचणी स्पर्धेमध्ये सहभागी झालेले फिरोदीया-शिवाजियन्स फुटबॉल लब, गुलमोहर फुटबॉल लब, बाटा फुटबॉल लब, सिटी लब, सुमन फुटबॉल लब, गुलमोहर फुटबॉल लब, जहारवीर फुटबॉल लब मधील खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष जोगासिंग मिनहास, कार्यकारी सदस्य रमेश परदेशी, कार्यकारी सदस्य व्हिटर जोसेफ, कार्यकारी सदस्य रणबीरसिंग परमार, कार्यकारी सदस्या पल्लवी सैंदाणे, झेव्हियर स्वामी तसेच मदतनीस राजेश अँथनी उपस्थित होते. राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी जिल्ह्याच्या संघास जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, मानद सचिव रोनप लेस फर्नांडीस व खजिनदार रिशपालसिंग परमार आदींनी शुभेच्छा दिल्या. नागपूर येथे अहमदनगर संघाचा पहिला सामना वर्धा जिल्हा संघाबरोबर खेळला जाणार आहे.