नगर – शहराच्या सावेडी विभागातील आठरे पाटील पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या विस्तीर्ण प्रांगणात फनलॅन्ड कार्निवल कार्यक्रमाचे उद्घाटन उदयोगपती रवी बक्षी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चंद्रभान आठरे पाटील ग्राम नवोदय ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.अनिल आठरे पाटील, विश्वस्त डॉ. अंजली आठरे पाटील, डॉ. आदिती आठरे पाटील, मानसिंग आठरे पाटील व संजय आठरे पाटील आदी उपस्थित होते. रवी बक्षी यावेळी बोलताना म्हणाले विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्व विकास, व्यवहार ज्ञान, संभाषण चातुर्य विकसित करण्याबरोबरच त्यांना आर्थिक देवाण-घेवाण शिकण्यासाठी फनलैंड कार्निवल कार्यक्रम उपयुक्त ठरेल असे कार्यक्रम विविध ठिकाणी होणे गरजेचे आहे आपण आता महानगरात राहतो, पुणे, मुबई येथे होणारे असे कार्यक्रम नगरमध्ये पण झाले पाहिजे असेही ते म्हणाले या कार्यक्रमामध्ये नृत्य, संगीत, अश्वरोहन, जलतरण, बलून शुटिंग, ट्रॅम्पोलिन, आर्चरी, वॉटर झॉरबिंग, बंजी जंम्पिंग, अॅन्ग्री बर्ड, क्षिल ऑफ फॉर्च्यून, बोट रेसिंग, बॉल इन लाऊन, डिस्क ड्रॉप, अंडर ओव्हर लकी सेव्हन, मैजिक शो, पपेट शो, बॉल फायडिंग, बंगी रन, बुल राईड, अरांऊड व वलर्ड, मेरी गो रांऊड, डि.जे.कॉर्नर, एलिमीनेटर, पेंट बॉल, बॉऊसिंग कॅस्टल या सारखे अनेक मनोरंजनात्मक खेळांचा आनंद घेण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. याशिवाय स्वादिस्ट व रुचकर व्हेज व नॉन व्हेज खाद्य पदार्थाचे स्टॉलही, नामांकित विक्रेत्यांकडून लावण्यात आलेले आहेत,त्याचाही मनमुराद आनंद घेऊन नगर करांनी फुल टू, धमाल मस्ती करण्यासाठी आहे असे संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे पाटील म्हणाले कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका कु.स्नेहल वाघमारे व सौ.प्रीती क्षीरसागर यांनी केले. यावेळी पालक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.