संत संताजी महाराजांच्या कार्याचा खऱ्या अर्थाने गौरव : भगवान फुलसौंदर

0
56

तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने ‘श्री संत संताजी महाराज पथ’ फलकाचे अनावरण

तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने ‘संत श्री संताजी महाराज पथ’ असे नामकरणाचा फलकाचे अनावरण करण्यात आले. 

नगर -नगरमध्ये तेली समाज मोठ्या प्रमाणात आहे, नगरच्या विविध क्षेत्रात कार्यरत राहून शहराच्या विकासात योगदान देत आहेत. विविध उपक्रमातून समाजाचे चांगले संघटन निर्माण झाले. समाजातील प्रत्येक घटकाची उन्नत्तीसाठी राबवित असलेल्या उपक्रमातून समाजोन्नत्तीचे काम होते. तेलीखुंटचे नामकरण आता ‘ संत श्री संताजी महाराज पथ’ असे करण्यात आले आहे. यातून संत संताजी महाराजांच्या कार्याचा खर्‍या अर्थाने गौरव होणार आहे. प्रत्येक समाजातील संतांनी समाजाला दिशा दिली आहे, त्यांचे विचार या मार्गावरुन जाताना कायम पथदर्शक राहतील, असा विश्वास माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केले. तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने तेलीखुंट ऐवजी ‘श्री संत संताजी महाराज पथ’ असे नामकरणाचा फलकाचे अनावरण भगवान फुलसौंदर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सचिन जाधव, हभप रामदास क्षीरसागर महाराज, विजय दळवी, रमेश साळूंके, कृष्णकांत साळूंके, विलास काळे, गणेश धारक, ट्रस्टचे अध्यक्ष प्रसाद शिंदे, उपाध्यक्ष मनोज क्षीरसागर, खजिनदार प्रकाश सैंदर, सचिव शोभना धारक, विश्वस्त सागर काळे, गोकूळ कोटकर, दत्तात्रय डोळसे, शशिकांत देवकर, सौ.निता लोखंडे, गोरख लोखंडे, प्रमोद डोळसे, अमोल शिंदे, संतोष घोडके, गणेश दहितुले, योगेश भागवत, कालिदास क्षीरसागर, वैभव शिंदे, दिपक धारक, अजय धारक, पवन साळूंके उपस्थित होते. याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष प्रसाद शिंदे म्हणाले, तेलीखुंट परिसराचे ‘संत श्री संताजी महाराज पथ’ असे नामकरण व्हावे, यासाठी मनपाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. समाजाच्या विनंतीला मान देऊन मनपाने हा ठराव मंजूर केला. आज ‘संत श्री संताजी महाराज पथ’ फलकाचे अनावरण झाले आहे, ही सर्वांसाठी आनंदायी बाब आहे. समाजाच्या एकत्रित प्रयत्नाचे हे यश आहे. तिळवण तेली ट्रस्टच्या माध्यमातून समाजाच्या उन्नत्तीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहे, त्याचा मोठा फायदा होत आहे. यापुढील काळात प्रत्येकाने पत्ता टाकतांना ‘संत श्री संताजी महाराज पथ’ असा टाकावा, असे आवाहन केले. याप्रसंगी सचिन जाधव, हभप रामदास क्षीरसागर यांनीही मनोगतातून ‘संत श्री संताजी महाराज पथ’ नामकरणातून त्यांचे कार्य कायम सर्वांना प्रेरणा देईल, असे सांगितले. प्रास्तविकात सचिव शोभना धारक यांनी ट्रस्टच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन मनोज क्षीरसागर यांनी केले तर आभार प्रकाश सैंदर यांनी मानले.