बँकेत भरणा करण्यासाठी दिलेले १० लाख घेवून कामगार पसार

0
46

नगरच्या बाजारपेठेतील घटना; गुन्हा दाखल

नगर – व्यापार्‍याने दुकानातील काम गाराजवळ विश्वासाने बँकेत भरणा करण्यासाठी दिलेली १० लाखांची रोकड घेवून कामगार पसार झाल्याची घटना मंगळवारी (दि.२३) दुपारी नगर शहरातील आडते बाजार येथे घडली आहे. या प्रकरणी कामगार सुशिल प्रकाश बिरादार (रा. वाणीनगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर) याच्यावर विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत व्यापारी प्रताप प्रेमचंद हर्दवानी (वय- ६०, रा. सुरभि हॉस्पीटलसमोर, गुलमोहर रोड, अहमदनगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हर्दवानी यांचे आडते बाजार येथे महाराष्ट ्र ट ्रेडर्स नावाचे होलसेल किराणा दुकान असुन सदरचे दुकानात सुशिल प्रकाश बिरादार हा मागील दिड महिन्यापासुन कामास आहे. त्याच्या कडे फिर्यादी हे विश्वासाने बँकेत पैसे भरणा करण्यासाठी देत होते व तो देखील विश्वासाने बँकेत पैसे भरणा करत होता. मंगळवारी (दि.२३) सकाळी ११ चे सुमारास फिर्यादी यांनी कामगार सुशिल बिरादार याचे कडे विश्वासाने ५ लाख रुपये रोख र क्कम ही मर्चंट बँकेत भरणा करण्यासाठी दिली होती. सुशिल हा ५ लाख रुपये घेवुन मचरट बँकेत भरणा करण्यासाठी दुकानातुन निघुन गेला.

 

त्यानंतर सकाळी ११.३० च्या सुमारास सुशिल दुकानात आला तेव्हा त्याचेकडे पुन्हा ५ पाच लाख रुपये रोख र क्कम पंजाब नॅशनल बँकेत भरणा करण्यासाठी दिले असता तो पंजाब नॅशनल बँकेत पैसे भरण्यासाठी दुकानातुन निघुन गेला. त्यानंतर खुप वेळ झाला तरी तो बँकेत पैसे भरुन दुकानात परत न आल्याने त्यास फोन केला असता त्याचा फोन बंद लागला. त्याला वारंवार फोन केला असता त्याचा फोन बंद लागल्याने फिर्यादी यांनी पंजाब नॅशनल बँकेत जावुन खात्री केली असता सुशिल याने बँकेत पैसे भरणा केले नसलेबाबत माहिती मिळाली. त्यानंतर मर्चट बँकेत जावुन सुशिलने पैसे भरणा केलेबाबत चौकशी केली असता तेथेही त्याने पैसे भरणा केले नसलेबाबत माहिती मिळाली. कामगार सुशिल बिरादार याचेकडे दिलेले एकुण १० लाख रुपये त्याने बॅकेत भरणा न करता विश्वासघात करुन सदर रकमेचा अपहार केला असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी सुशिल बिरादार याच्या विरुद्ध भा.दं.वि. कलम ४०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.