आरोपी बाळ बोठे याचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला

0
118

नगर – बहुचर्चित रेखा जरे खून खटल्यातील संशयित आरोपी बाळ बोठे याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने नामंजूर केला आहे. न्यायमुर्ती संजय देशमुख यांच्या समोर जामीन अर्जावर मंगळवारी (दि.२३) सुनावणी झाली. त्यांनी बोठेचा जामीन अर्ज नामंजूर केला असल्याची माहिती अ‍ॅेड. नारायण नरवडे यांनी दिली. रेखा जरे यांचा तीन वषारपूर्वी नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुयातील जातेगाव घाटात खून झाला होता. या गुन्ह्यात बोठे संशयित आरोपी असून तो सध्या कोठडीत आहे. या खटल्याची सुनावणी सध्या येथील जिल्हा न्यायालयात सुरू आहे. आतापर्यंत  फिर्यादी असलेल्या प्रत्यक्ष साक्षीदार व इन् क्केस्ट पंचनाम्यातील अन्य एका साक्षीदाराची साक्ष न्यायालयासमोर नोंदवली गेली आहे.

दरम्यान या गुन्ह्यातील संशयित आरोपी सागर भिंगारदिवे याने छत्रपती संभाजीनगर खंडपीठात जामिनासाठी अर्ज केला होता, तो खंडपीठाने नामंजूर केला होता व सत्र न्यायालयासमोर सुनावणी दर दिवशी घेण्यासंबंधी आदेश दिले होते. दर दिवशी होणार्‍या सुनावणीसाठी उपस्थित राहणे शय नसल्याने सरकारी वकील उमेशचंद्र यादव- पाटील यांनी या खटल्याचे कामकाज पाहण्यास नकार दिला आहे. दरम्यान बोठे याने एक महिन्यापूर्वी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात जामिनीसाठी अर्ज दाखल केला होता. न्यायमुर्ती देशमुख यांच्यासमोर या अर्जावर सुनावणी झाली असून त्यांनी बोठेचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे.