केडगाव येथे साकारण्यात आली प्रभू श्रीरामाची ३१ फूट रांगोळी अन्‌ दीड हजार दिव्यांची आरास

0
25

नगर – अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या येथील प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेचा आनंद संपूर्ण देशात साजरा करण्यात आला. केडगाव येथील जगदंबा तरुण मंडळ, शिवमुद्रा ग्रुप तसेच सकल हिंदू समाज यांच्या वतीने श्रीराम रंगी रंगले उत्सवाचे आयोजन केले होते. आयोध्या येथील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा आनंद साजरा करण्यासाठी हा उत्सव केडगाव येथे साजरा करण्यात आला. परिसरातील नागरिकांनी प्रभू श्रीरामाची ३१ फूट भव्य रांगोळी साकारली होती. त्यामध्ये प्रभू श्रीरामाची व आयोध्या येथील राम मंदिराची प्रतिकृती रेखाटण्यात आली. तसेच परिसरातील प्रत्येक महिलेने एक दिवा प्रभू श्रीरामांच्या चरणी या संकल्पनेतून जवळपास दीड हजार दिव्यांची आरास केडगाव देवी मंदिरासमोर केली होती. कार्यक्रमांमध्ये प्रभू श्रीरामचंद्र, लक्ष्मण, सीता व हनुमान यांची वेशभूषा केलेल्या मुलांनी येणार्‍या प्रत्येकाचे लक्ष वेधले. तसेच २१ फूट भव्य असे प्रभू श्रीरामांचे होडिरग देवी मंदिरासमोर लावण्यात आले होते.

जगदंबा तरुण मंडळ, शिवमुद्रा ग्रुप व सकल हिंदू समाजाच्या वतीने श्रीराम रंगी रंगले उत्सवाचे आयोजन

प्रभू श्रीरामचंद्रांची आरती मा. नगरसेवक मनोज कोतकर व इंजिनिअर प्रसाद आंधळे यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच परिसरातील महिलांनी पेटवलेल्या दिव्यांमुळे संपूर्ण परिसर उजळून गेला होता.शेवटी फटायांची आतिषबाजी आणि प्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या वेळी परिसरातील नागरिकांनी रांगोळी सजावटीसाठी आणि सायंकाळी दिवे लावण्यासाठी भाग घेतला. यावेळी बच्चन कोतकर, अजित कोतकर, अण्णा शिंदे, बंटी विरकर, शाम कोतकर, आकाश शिंदे, नितीन ठुबे, सुहास साळुंखे, रोहित साके, रामदास काकडे, ओंकार कोतकर, प्रवीण अकोलकर, राहुल काळापहाड, अजिंय कोतकर, चैतन्य कोतकर, अमोल कोतकर, विशाल पाठक, रेखा साके, अंजली भोसले, तन्वी दुतारे, अंकिता बुगे, वैष्णवी कोतकर, ललिता तावरे, सारिका दुतारे, नम्रता कोतकर, संदीप भोर, उमेश ठोंबरे, राजन कदम आदी उपस्थित होते.