प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीस वंदन करून सोहम स्पोट्‌र्स ॲकॅडमीचे मल्लखांब प्रात्यक्षिक

0
6

नगर – संपूर्ण भारत श्रीराम जन्म उस्तव साजरा करत आहे. ५०० वर्षाच्या प्रदिर्घ प्रतिक्षे नंतर रामलल्लांची मूर्ती आयोध्या नगरीत राम मंदिरात प्राण प्रतिष्ठपणा होत असताना ऐतिहासिक नगर शहरातून सोहम अ‍ॅकॅडमीतर्फे मल्लखांबच्या माध्यमातून श्रीरामास मानवंदना करण्यात आले आहे. हा कार्यक्रम नानासाहेब जाधव व नगरसेवक मनोज दुलम आणि विनोद म्याना यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी सोहम स्पोट् र्स अ‍ॅकॅडमीचे आंतर राष्ट्रीय गोल्ड मेडेलिस्ट योगेश म्याकल यांनी मल्लखांब आजच्या युवकांना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ मिळवायला खूप गरजेचे आहे,असे सांगितले. श्रीरामांच्या प्रतिमेची पूजा करून मल्लखांबचे नेत्रदीपक प्रात्यक्षिक सोहम स्पोट२र्स अ‍ॅकॅडमीमधील युवकांनी सादर केले. अ‍ॅकॅडमीमध्ये योगासन, मल्लखांब आणि जिमण्यास्टीक अशा क्रिडा प्रकार शिकवले जातात असे सौ. वषार म्याकल यांनी आभार मानताना सांगितले.