नगर – हिंद सेवा मंडळ शैक्षणीक संस्थेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत किरकोळ वाद वगळता सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. यामध्ये बहुचर्चित भूखंडाचा ताबा देण्याच्या ठरावास सभासदांनी हात वर करून मंजूर मंजूरच्या घोषण देत या ठरावास बहुमताने मंजुरी दिली. संस्थेचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस कार्याध्यक्ष अॅड. अनंत फडणीस, मानद सचिव संजय जोशी यांच्यासह संचालक, शिक्षक प्रतिनिधी व जिल्ह्यातून आलेले सभासद उपस्थित होते. यावेळी सभासद वसंत लोढा, दीप चव्हाण, संजय घुले, अनिल गट्टानी आदींनी भूखंडाच्या ठरावास विरोध केला. प्रारंभी अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक यांनी सभेच्या अजेंड्या वरील विषयांचे वाचन केले. यात मुलांच्या वसतिगृहाच्या जागेच्या विषयासंबंधी ३ जानेवारी रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत झालेल्या ठरावाचे वाचन करून हा ठराव सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी मांडला. अॅड. अनंत फडणीस कायदेशीर बाजू मांडत म्हणाले, हिंद सेवा मंडळाला तकिया ट ्रस्टने भाड्याने दिलेली जागा अनेक वषारपासून पडीक आहे. याबबतचा कायदेशीर निकाल संस्थेच्या बाजूने लागला आहे. या भूखंडाचा ताबा सोडण्याचा निर्णयास काही संचालकांनी व सभासदांनी विरोध जरी केला असला तरी हा निर्णय कायदेशीरच असून संस्थेच्या हितासाठीच आम्ही घेतला आहे. काही राजकीय व्येी या प्रकरणात खोटे आरोप करत यात राजकारण आणत आहेत. संस्थेवर खोटे आरोप करून पेपरबाजी करण्याची ही प्रथा बंद करा.
प्रास्ताविकात सचिव संजय जोशी म्हणाले, स्थापनेचे शतक पूर्ण केलेल्या हिंद सेवा मंडळाने अनेक चढ उतार पहिले आहेत. इंग्रजी शाळांच्या तुलनेत मराठी शाळा कमी होत आहेत. स्पर्धेच्या या युगात टिकण्यासाठी काळा बरोबर धोरणात्मक निर्णय घेत असल्याने संस्थेच्या सर्व मराठी शाळा प्रगतीची घोडदौड करत आहेत. शाळा महाविद्यालयामधील विद्यार्थी चौफेर प्रगती सर्व क्षेत्रात करत आहेत. यावेळी सभासद संजय छल्लारे, रवींद्र गुलाटी, अॅड.जयवंत भापकर आदींनी ठरावाच्या बाजूने मत व्ये केली. तर सभासद दीप चव्हाण, वसंत लोढा, अनिल गट्टानी, संजय घुले, अच्युत पिंगळे यांनी विरोध करत मत व्ये केली. यावेळी संचालक अजित बोरा, अनिल देशपांडे, सुमतिलाल कोठारी, ज्योती कुलकर्णी, दिलीप शहा, रणजीत श्रीगोड, डॉ.रमेश झरकर, अशोक उपाध्ये, डॉ.पारस कोठारी, सुरेश चव्हाण, अरुण दु१/२गड, सेवक प्रतिनिधी विठ्ठल उरमुडे, कल्याण लकडे, आदिनाथ जोशी, गिरीष पाखरे, योगेश देशमुख, सुनील सुसरे, बाळासाहेब कुलकर्णी आदी उपस्थित होते.