नगरमध्ये गोमांस विक्री करणाऱ्या दोघांवर कारवाई

0
38

३२ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त

नगर -पंचपीर चावडी परिसरात दोन ठिकाणी गोमांस विक्री सुरु असलेल्या ठिकाणी कोतवाली पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी (दि.१९) छापेमारी करत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या ताब्यातून गोमांस, लोखंडी सत्तूर तसेच रोख र क्कम असा ३२ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पंचपीर चावडी परिसरात फरसाणच्या दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या बोळात पडया घरात पत्र्याच्या शेडच्या आडोशाला शोहेब लियाकत कुरेशी (रा. झेंडीगेट) हा गोवंशीय जनावरांचे मांसाचे मोठ मोठे तुकडे सत्तूरच्या सहाय्याने तोडताना आढळून आला.

पोलिसांनी तेथे ६ हजार रुपये किमतीचे गोमांस, सत्तूर व १७ हजार १५० रुपयांची रोकड असा २३ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दुसरी कारवाई पंचपीर चावडी परिसरातच ए वन टि क्का हॉटेलच्या मागील बोळात एका पडया घरात करण्यात आली. तेथे शकील बाबासाब कुरेशी (रा. हमालवाडा, झेंडीगेट) हा गोमांस विक्री करताना आढळून आला. त्याच्या कडून ५ हजार रुपये किमतीचे गोमांस, लोखंडी सत्तूर व ४ हजार ५७० रुपये रोख असा ९ हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.