तब्बल दीड वर्षापासून खोदून ठेवलेल्या रस्त्यावर पायी चालणेही झाले कठीण

0
36

गणेश चौक ते केशव कॉर्नर रस्त्याची दुरावस्था; दत्ता पाटील सप्रे यांचे खा. सुजय विखे यांना निवेदन

नगर – अहमदनगर महापालिकेने गणेश चौक ते केशव कॉर्नर बोल्हेगाव हा रस्ता गेली दीड वषारपासून खोदून ठेवला आहे. या रस्त्याची वर्क ऑर्डर होऊन १८ महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे. सदर रस्त्याचे काम ठेकेदार करत नाही. हा रस्ता महापालिकेच्या फंडामधून मंजूर झाला होता. मात्र या फंडामध्ये पैसे नसल्यामुळे ठेकेदार काम करत नाही. या प्रभागात नागापूर बोल्हेगाव परिसरामध्ये ३५ ते ४० हजार लोकवस्ती आहे. सदर रस्ता हा नागापूर बोल्हेगाव परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन रहदारीचा असून या रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे आतापयरत बरेच अपघात झाले असून महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.

या भागामध्ये बर्‍याच लहान मोठ्या शैक्षणिक संस्था आहेत. तसेच या भागात मोठ्या प्रमाणात कामगार लोकांची वसाहत असून या रस्त्याम धून नागरिकांना महिलांना, वृद्धांना, लहान मुलांना पायी चालणे देखील कठीण होऊन बसले आहे. अत्तापायरत ५० ते ६० नागरिक रस्त्यामध्ये घसरून पडून जखमी झालेले आहेत. काहींची हाडे मोडलेली आहेत. तरी या रस्त्याचे काम मार्गी लावावे, तसेच सदर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याची अनामत र क्कम जप्त करण्यात यावी जेणेकरून इतर ठेकेदार नागरिकांच्या जीविताशी खेळणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी खा. सुजय विखे यांच्याकडे माजी नगरसेवक दत्ता पाटील सप्रे व माजी नगरसेविका कमलताई सप्रे यांनी निवेदनातून केली. यावेळी आकाश कातोरे उपस्थित होते.